Wednesday, April 24, 2024
Homeदेश विदेशCovid-19 : देशातील एकूण रुग्णांची संख्या ७० लाखांच्यावर

Covid-19 : देशातील एकूण रुग्णांची संख्या ७० लाखांच्यावर

दिल्ली | Delhi

देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये करोनाबाधितांच्या संख्येत घसरण दिसली होती. परंतु आता पुन्हा एकदा ही संख्या वाढताना दिसत आहे. गेल्या २४ तासात देशात ७४ हजाराच्यावर रूग्ण आढळून आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार,

- Advertisement -

गेल्या २४ तासात ९१८ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या २४ तासात ७४ हजार ३८३ रूग्ण आढळले आहे. देशातील एकूण करोना बाधितांची संख्या ७० लाख ५३ हजार ८०७ इतकी झाली आहे. त्यातील आजपर्यंत ६० लाख ७७ हजार ९७७ रूग्ण करोनामुक्त झाले असून ८ लाख ६७ हजार ४९६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात आजपर्यंत १ लाख ०८ हजार ३३४ रुग्णांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रातील स्थिती…

राज्यात मागील २४ तासात ११ हजार ४१६ करोना बाधित रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता १५ लाख १७ हजार ४३४ एवढी झाली आहे. तर काल एका दिवसात २६ हजार ४४० करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण १२ लाख ५५ हजार ७७९ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण २ लाख २१ हजार ६१५ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान, काल एका दिवसात ३०८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यात एकूण ४० हजार ०४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या