Saturday, April 27, 2024
Homeमुख्य बातम्याCovid-19 : देशातील रुग्णसंख्या ७५ लाखांच्या पुढे

Covid-19 : देशातील रुग्णसंख्या ७५ लाखांच्या पुढे

दिल्ली | Delhi

देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत होता. गेल्या काही दिवसांमध्ये करोनाबाधितांच्या संख्येत घसरण दिसत आहे. गेल्या २४ तासात देशात ५५ हजाराच्यावर रूग्ण आढळून आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार,

- Advertisement -

गेल्या २४ तासात ५७९ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या २४ तासात ५५ हजार ७२२ रूग्ण आढळले आहे. देशातील एकूण करोना बाधितांची संख्या ७५ लाख ५० हजार २७३ इतकी झाली आहे. त्यातील आजपर्यंत ६६ लाख ६३ हजार ६०८ रूग्ण करोनामुक्त झाले असून ७ लाख ७२ हजार ५५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात आजपर्यंत १ लाख १४ हजार ६१० रुग्णांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

देशात १८ ऑक्टोबर पर्यंत ९ कोटी ५० लाख ८३ हजार ९७६ नमूने तपासल्या गेले. ज्यापैकी ८ लाख ५९ हजार ७८६ नमूने काल तपासण्यात आले असल्याची माहिती आयसीएमआरने देण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या