Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याCovid-19 : देशात रुग्णांच्या संख्येत होतेय घसरण

Covid-19 : देशात रुग्णांच्या संख्येत होतेय घसरण

दिल्ली | Delhi

देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत होता. गेल्या काही दिवसांमध्ये करोनाबाधितांच्या संख्येत घसरण दिसत आहे. गेल्या २४ तासात देशात ६२ हजाराच्यावर रूग्ण आढळून आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार,

- Advertisement -

गेल्या २४ तासात ८३७ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या २४ तासात ६२ हजार २१२ रूग्ण आढळले आहे. देशातील एकूण करोना बाधितांची संख्या ७४ लाख ३२ हजार ६८१ इतकी झाली आहे. त्यातील आजपर्यंत ६५ लाख २४ हजार ५९६ रूग्ण करोनामुक्त झाले असून ७ लाख ९५ हजार ०८७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात आजपर्यंत १ लाख १२ हजार ९९८ रुग्णांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रातील स्थिती…

महाराष्ट्रात शुक्रवारी (१६ ऑक्टोबर) १३ हजार ८८५ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आतापर्यंत एकूण १३ लाख ४४ हजार ३६८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८५.३ % एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ % एवढा आहे. राज्यात आज रोजी एकूण १ लाख ८९ हजार ७१५ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या