Covid-19 : देशातील रुग्णसंख्येने ओलांडला ६३ लाखांचा टप्पा

गेल्या २४ तासात १ हजार १८१ रुग्णाचा मृत्यू
करोना अपडेट
करोना अपडेट

दिल्ली | Delhi

देशात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या २४ तासात देशात ८६ हजाराच्यावर रूग्ण आढळून आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार,

गेल्या २४ तासात १ हजार १८१ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या २४ तासात ८६ हजार ८२१ रूग्ण आढळले आहे. देशातील एकूण करोना बाधितांची संख्या ६३ लाख १२ हजार ५८५ इतकी झाली आहे. त्यातील आजपर्यंत ५२ लाख ७३ हजार २०२ रूग्ण करोनामुक्त झाले असून ९ लाख ४० हजार ४४१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात आजपर्यंत ९८ हजार ६७८ रुग्णांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

देशात मोठ्या प्रमाणात करोना चाचण्याही वाढवण्यात आल्या आहेत. काल देशात एकूण १४ लाख २३ हजार ०५२ करोना चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत देशभरात ७ कोटी ५६ लाख १९ हजार ७८१ करोना चाचण्या करण्यात आल्याची माहिती ICMR कडून देण्यात आली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com