Covid-19 : देशातील रुग्णसंख्या ७७ लाखांच्यावर !

jalgaon-digital
1 Min Read

दिल्ली | Delhi

देशात गेल्या काही दिवसांमध्ये करोनाबाधितांच्या संख्येत घसरण दिसत आहे. मागील २४ तासात करोना रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढली आहे. गेल्या २४ तासात देशात ५५ हजाराच्यावर रूग्ण आढळून आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार,

गेल्या २४ तासात ७०२ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या २४ तासात ५५ हजार ८३८ रूग्ण आढळले आहे. देशातील एकूण करोना बाधितांची संख्या ७७ लाख ०६ हजार ९४६ इतकी झाली आहे. त्यातील आजपर्यंत ६८ लाख ७४ हजार ५१८ रूग्ण करोनामुक्त झाले असून ७ लाख १५ हजार ८१२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात आजपर्यंत १ लाख १६ हजार ६१६रुग्णांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रातील स्थिती

राज्यात मागील २४ तासात ८ हजार १४२ करोना बाधित रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता १६ लाख १७ हजार ६५८ एवढी झाली आहे. तर काल एका दिवसात २३ हजार ३७१ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण १४ लाख १५ हजार ६७९ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. तर राज्यात एकूण १ लाख ५८ हजार ८५२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, काल एका दिवसात १८० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यात एकूण ४२ हजार ६३३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *