Covid-19 : देशात गेल्या २४ तासात ७३ हजारांच्यावर नवे रुग्ण

देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या ६९ लाखांच्या पुढे
Covid-19 : देशात गेल्या २४ तासात ७३ हजारांच्यावर नवे रुग्ण

दिल्ली | Delhi

देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये करोनाबाधितांच्या संख्येत घसरण दिसली होती. परंतु आता पुन्हा एकदा ही संख्या वाढताना दिसत आहे. गेल्या २४ तासात देशात ७३ हजाराच्यावर रूग्ण आढळून आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार,

गेल्या २४ तासात ९२६ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या २४ तासात ७३ हजार २७२ रूग्ण आढळले आहे. देशातील एकूण करोना बाधितांची संख्या ६९ लाख ७९ हजार ४२४ इतकी झाली आहे. त्यातील आजपर्यंत ५९ लाख ८८ हजार ८२३ रूग्ण करोनामुक्त झाले असून ८ लाख ८३ हजार १८५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात आजपर्यंत १ लाख ७ हजार ४१६ रुग्णांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

देशभरात ९ ऑक्टोबरपर्यंत ८,५७,९८,६९८ नमूने तपासले गेले. यातील ११ लाख ६४ हजार १८ नमूने काल तपासण्यात आले असल्याची माहिती आयसीएमआरकडून मिळाली आहे.

महाराष्ट्रातील स्थिती...

दरम्यान राज्यात कालपर्यंत तपासण्यात आलेल्या ७४,८७,३८३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १५,०६,०१८ (२०.११ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तर राज्यात २३,००,५८८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. महाराष्ट्रात काल १७,३२३ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १२,२९,३३९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८१. ६३ % एवढे झाले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com