Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशCovid-19 : देशातील रुग्णांची संख्या घटली !

Covid-19 : देशातील रुग्णांची संख्या घटली !

दिल्ली | Delhi

करोनाबाधितांच्या संख्येत घसरण दिसत आहे. गेल्या २४ तासात देशात ६६ हजाराच्यावर रूग्ण आढळून आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार,

- Advertisement -

गेल्या २४ तासात ८१६ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या २४ तासात ६६ हजार ७३२ रूग्ण आढळले आहे. देशातील एकूण करोना बाधितांची संख्या ७१ लाख २० हजार ५३९ इतकी झाली आहे. त्यातील आजपर्यंत ६१ लाख ४९ हजार ५३६ रूग्ण करोनामुक्त झाले असून ८ लाख ६१ हजार ८५३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात आजपर्यंत १ लाख ०९ हजार १५० रुग्णांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

देशातील करोनाबाधितांच्या संख्येने ७ ऑगस्टला २० लाखांचा टप्पा पार केला होता. त्यानंतर २३ ऑगस्ट रोजी ३० लाख, ५ सप्टेंबरला ४० लाख, १६ सप्टेंबरला ५० लाख आणि २८ सप्टेंबरला ६० लाख रुग्णसंख्येचा टप्पा पार झाला होता. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, तमिळनाडू या राज्यांत सर्वाधिक म्हणजे ६१ टक्के रुग्ण असून, या राज्यांत बरे होणाऱ्यांचे प्रमाण ५४.३ टक्के आहे.

महाराष्ट्रातील स्थिती…

राज्यात मागील २४ तासात १० हजार ७९२ करोना बाधित रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता १५ लाख २८ हजार २२६ एवढी झाली आहे. तर काल एका दिवसात १० हजार ४६१ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण १२ लाख ६६ हजार २४० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात एकूण २ लाख २१ हजार ६३७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान, काल एका दिवसात ३०९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यात एकूण ४० हजार ३४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या