गृहमंत्र्यांची घोषणा : कोरोनामुळे राज्यात पोलिसांना ‘वर्क फ्रॉम होम’

गृहमंत्र्यांची घोषणा : कोरोनामुळे राज्यात पोलिसांना ‘वर्क फ्रॉम होम’
मानवंदना देताना पोलिस दल

राज्यात कोरोना रुग्णांची आकडेवारीही वाढू लागली आहे. राज्यातील बहुतांश मंत्र्यांना आणि आमदारांना कोरोनाची (Corona in Maharashtra) लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील 55 वर्षांच्या वरील पोलिसांसाठी (police in Maharashtra) महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

मानवंदना देताना पोलिस दल
गौतमच्या गोड बातमीनंतर काजलने शेअर केले ग्लॅमरस फोटो

राज्यातील वर्षे 55 आणि त्याहून अधिक वय (Work from home for police) असलेल्या पोलिसांना आता पुढील काळात वर्क फ्रॉम होम काम करण्याची संधी मिळणार आहे, असे आदेश राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांनी दिले आहेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पन्नास वर्षांच्या वरीलव्यक्तींना सर्वाधिक फटका बसला होता. त्यात पोलीस हे अत्यावश्यक सेवेत येत असल्यामुळे अशा पोलिसांना त्रास सहन करावा लागू नये म्हणून आता राज्यभरातील 55 वर्षांच्या वरील पोलीसानासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com