Monday, April 29, 2024
Homeदेश विदेशCovid-19 : देशात गेल्या २४ तासात रुग्णसंख्येत घट

Covid-19 : देशात गेल्या २४ तासात रुग्णसंख्येत घट

दिल्ली | Delhi

देशात गेल्या काही दिवसांमध्ये करोनाबाधितांच्या संख्येत वाढ दिसत होती. मात्र मागील २४ तासात करोना रुग्णसंख्या घटली आहे. गेल्या २४ तासात देशात ४५ हजाराच्यावर रूग्ण आढळून आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार,

- Advertisement -

गेल्या २४ तासात ४८० रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या २४ तासात ४५ हजार १४९ रूग्ण आढळले आहे. देशातील एकूण करोना बाधितांची संख्या ७९ लाख ०९ हजार ९५९ इतकी झाली आहे. त्यातील आजपर्यंत ७१ लाख ३७ हजार २२८ रूग्ण करोनामुक्त झाले असून ६ लाख ५३ हजार ७१७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात आजपर्यंत १ लाख १९ हजार ०१४ रुग्णांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रातील स्थिती

राज्यात मागील २४ तासात ६ हजार ०५९ करोना बाधित रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता १६ लाख ४५ हजार ०२० एवढी झाली आहे. तर काल एका दिवसात ५ हजार ६४८ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण १४ लाख ६० हजार ७५५ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. तर राज्यात एकूण १ लाख ४१ हजार ०१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, काल एका दिवसात ११२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यात एकूण ४३ हजार २६४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या