आजपासून राज्यात कडक निर्बंध; लग्नसोहळे अंत्यविधीसाठी 'असे' असतील नियम

नाशिकमध्ये राज्य सरकारचे निर्बंध जसेच्या तसे लागू - जिल्हाधिकारी सुरज मांढरे
आजपासून राज्यात कडक निर्बंध; लग्नसोहळे अंत्यविधीसाठी 'असे' असतील नियम

मुंबई/नाशिक Mumbai /Nashik

गेल्या तीन दिवसांत करोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. एकीकडे राज्याच्या चिंतेत भर पडलेली असतानाचा नाशिकमध्येही काल (दि ३०) ओमायक्रोनचा रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली आहे.... (New guidelines after health dept and task force yesterdays meeting)

आजपासून राज्यात कडक निर्बंध; लग्नसोहळे अंत्यविधीसाठी 'असे' असतील नियम
नाशिकमध्ये ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला

राज्यात ओमायक्रॉनबाधित रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून टास्क फोर्स (Task Force) आणि आरोग्य विभागाच्या (Health Dept) बैठकीनंतर राज्यात निर्बंध लागू करण्याचा निर्णय जारी करण्यात आला आहे.

राज्याने घेतलेला निर्णय जसाच्या तसा नाशिक जिल्ह्याला लागू होणार असल्याचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे (Nashik Collector Suraj Mandhare) यांनी म्हटले आहे. राज्याने घेतलेल्या निर्णयानुसार सांस्कृतिक, धार्मिक (Cultural and ritual program), राजकीय कार्यक्रम (Political Programs) आणि लग्नसोहळ्याला (Wedding Ceremony) केवळ ५० लोकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.

आजपासून राज्यात कडक निर्बंध; लग्नसोहळे अंत्यविधीसाठी 'असे' असतील नियम
सज्ज राहा, कठोर पावले उचला!

तर अंत्यसंस्कारासाठी (Funeral /last rits) २० लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. या नियमांची अंमलबजावणी आजपासून करण्यात येत आहे. ३१ डिसेंबरला (31st Dec Celebration) होणारी गर्दी लक्षात घेता पर्यटनस्थळावर जमावबंदी (Tourist places restricted) लागू करण्यात आली आहे. तसेच स्थानिक प्रशासनाला कडक निर्बंध लावण्याची मुभा देण्यात आली आहे.

करोनाबाबत आधीचे निर्बंधही (Covid 19 old guidelines) कायम राहतील असेही काल मध्यरात्री (midnight) जारी करण्यात आलेल्या नियमावलीत (New Guidelines) म्हटले आहे. राज्यात तब्बल ५ हजार ३६८ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून २२ रुग्ण दगावल्याची नोंद आहे. राज्यात काल(दि ३०) एकूण १९८ ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.

राज्यात आतापर्यंत ४५० ओमायक्रॉनबाधितांची नोंद (Omicron Patients increased in mh) झाली आहे. ओमायक्रॉनबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने प्रशासनाच्या चिंतेत मोठी भर पडली आहे.

असे असतील नवे निर्बंध?

  • सांस्कृतिक, धार्मिक तसेच राजकीय कार्यक्रम आणि लग्नसोहळे यास केवळ ५० लोकांना उपस्थित राहता येणार

  • अंत्यसंस्कारासाठी केवळ २० लोकांना उपस्थिती राहता येणार

  • पर्यटनस्थळावर जमावबंदी आदेश जारी

  • कोरोनाबाबत आधीचे निर्बंधही कायम राहणार आहेत

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com