सिरम पाठोपाठ भारत बायोटेकने केली किंमत कमी

सिरम पाठोपाठ भारत बायोटेकने केली किंमत कमी

नवी दिल्ली

१ मे पासून केंद्र सरकारनं १८ वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणाला परवानगी दिली आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लसीकरण हा पर्याय असल्याचे म्हटले जात आहे. परंतु १८ वर्षांवरील व ४४ वर्षापर्यंतच्या नागरिकांचे लसीकरण राज्यांना करायचे आहे. या लसीकरणासाठी

सिरम इन्स्टिट्यूटने लसीचे दर कमी केल्यानंतर आता भारत बायोटेक कंपनीनेही लसीचे दर घटविले आहेत.

Title Name
सीरमने राज्यासाठी लसीची किंमत घटवली पण...
सिरम पाठोपाठ भारत बायोटेकने केली किंमत कमी

भारत बायोटेकची कोवॅक्सिन ही लस राज्य सरकारांना प्रति डोस ६०० रुपयांना देणार होती. या दरात कपात करुन आता ती प्रति डोस ४०० रुपयांना दिली जाणार आहे. भारत बायोटेकने कोवॅक्सीनचा प्रति डोस खासगी रुग्णालयांना १२०० रुपये आणि राज्य सरकारांना ६०० रुपयांना देण्याचे जाहिर केले आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारला हा डोस १५० रुपयांना दिला जाणार आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्यांच्या दरात फरक का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अखेर याची दखल घेत सिरमने राज्यांसाठीचा दर १०० रुपयांनी कमी केला आहे. तर, भारत बायोटेकने २०० रुपये कमी केले आहेत.

Title Name
co win registration : एकाच दिवसात १.३३ कोटी जणांची नोंदणी
सिरम पाठोपाठ भारत बायोटेकने केली किंमत कमी

केंद्र सरकारने लस उत्पादनाच्या ५० टक्के लसी खुल्या बाजारपेठेत विकण्याची मुभा दिली होती. त्यानंतर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक या कंपन्यांनी आपल्या लसीचे दर जाहीर केले होते. परंतु एकाच लसीचे तीन दर का असे म्हणत अनेकांनी त्यावर टीका केली होती. सर्वाच्च न्यायालयानेही यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com