शिवसेना भवन आणि पक्षनिधी कोणाचा? सर्वोच्च न्यायालयाने काय दिला निकाल?; जाणून घ्या

शिवसेना भवन आणि पक्षनिधी कोणाचा? सर्वोच्च न्यायालयाने काय दिला निकाल?; जाणून घ्या

मुंबई | Mumbai

ठाकरे गटाची (Thackeray Group) संपत्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde Group) यांच्या गटाला देण्याबाबतच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुनावणी होती. या याचिकेबाबतची मोठी बातमी समोर आली असून सुप्रिम कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे (Supreme Court Dismissed Plea). त्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा मिळाला आहे.

शिंदे गटाला शिवसेना भवन, शिवसेनेच्या शाखा, आणि पक्षाचा निधी मिळावा, यासाठी आशिष गिरी नावाच्या वकीलाने सुप्रिम कोर्टात याचिका दाखल केली होती मात्र ही याचिका सुप्रिम कोर्टाने फेटाळली आहे. आशिष गिरी (Ashish Giri) यांचा शिवसेनेसोबत काहीही संबंध नाही असं म्हणत ही याचिका कोर्टाने फोटाळली आहे.

शिवसेना भवन आणि पक्षनिधी कोणाचा? सर्वोच्च न्यायालयाने काय दिला निकाल?; जाणून घ्या
भाजपला शिंदे सरकारचं ओझं झालंय; संजय राऊतांचा टोला

दरम्यान, शिवसेना पक्षाच्या मालमत्ते बाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली असून उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) गटाला पक्षाची संपत्ती द्यायची की नाही याबाबत ही सुनावणी होती. यावेळी संपत्ती शिंदेंना द्यावी अशी मागणी करणारे तुम्ही कोण? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्या वकिलाला केला आहे.

त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. कोर्टाने शिंदे यांची याचिका फेटाळून लावल्याने शिवसेना भवन, शिवसेनेच्या शाखांचा ताबा ठाकरे गटाकडेच राहणार आहे. तसेच शिवसेनेचा निधीही ठाकरे गटाकडेच राहणार आहे.

शिवसेना भवन आणि पक्षनिधी कोणाचा? सर्वोच्च न्यायालयाने काय दिला निकाल?; जाणून घ्या
APMC Election 2023 : नाशिक बाजार समितीसाठी 'कांँटे की टक्कर'; आतापर्यंत किती झाले मतदान?

मुळ शिवसेनेची मोठा पक्षनिधी असून याशिवाय शिवसेनेच्या अनेक संस्था, कार्यालयं, शाखा आहेत. त्यावर कोणाचा हक्क याकडे न्यायालययाकडे कशा प्रकारे पाहतं हे महत्त्वाचं आहे. शिवसेना पक्ष कुणाचा यावर निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे.

त्यामुळे शिवसेनेच्या नावे बँक खातं केवळ शिवसेनेचं असेल, तर त्याचे सर्व अधिकार शिंदे गटाला जातात. त्यामुळे तो पक्षनिधी शिंदे गटाकडे वर्ग करा अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली होती. मात्र आता सुप्रिम कार्टाने ही याचिका अखेर फेटाळली आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com