Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याकिरीट सोमय्यांना झटका; न्यायालयाने दिले चौकशीचे आदेश

किरीट सोमय्यांना झटका; न्यायालयाने दिले चौकशीचे आदेश

मुंबई | Mumbai

सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याशी (Sarsenapati Santaji Ghorpade Sugar Factory) संबंधित 40 कोटींच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी माजी कामगार मंत्री आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या अडचणीत गेल्या काही दिवसांपासून वाढ झाली आहे.

- Advertisement -

कधी चौकशी तर, कधी धाडी अशा चक्रव्युहात अडकलेल्या माजी कामगार मंत्री, आमदार हसन मुश्रीफ यांना तूर्तास मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. मुंबई उच्च न्यायालाने (Bombay High Court) नुकत्याच दिलेल्या आदेशात, 24 एप्रिलपर्यंत कोणतीही कठोर कारवाई पोलिसांनी करू नये असे म्हणण्यात आले आहे.

कालव्यात पडलेल्या ‘त्या’ जवानाचा मृत्यू; 20 तासांनंतर सापडला मृतदेह

मात्र एकीकडे हसन मुश्रीफ यांना दिलासा मिळाला असला तरी, दुसरीकडे मात्र हसन मुश्रीफांवर आरोप करत त्यांची डोकेदुखी वाढविणाऱ्या किरीट सोमय्या यांना उच्च न्यायालयाने झटका दिला आहे. याप्रकरणी आरोप करणाऱ्या भाजप नेते किरीट सोमय्यांविरोधात न्यायालयीन चौकशीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

हसन मुश्रीफ यांच्या प्रकरणाशी कोणताही थेट संबंध नसताना किरीट सोमय्यांना कोर्टाच्या आदेशांची तसेच एफआयआरची कॉपी सर्वात आधी कशी उपलब्ध होते? असा खडा सवाल न्यायालयाने यावेळी केला आहे. या प्रकरणी पुणे सत्र न्यायालयाच्या (Pune Sessions Court) प्रधान न्यायाधीशांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे किरीट सोमय्यांनाच (BJP leader Kirit Somaiya) आता न्यायालयीन चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या