Monday, April 29, 2024
Homeमुख्य बातम्याशरद पवारांच्या घरावर हल्ला : गुणरत्न सदावर्तेंना पोलीस कोठडी, इतर आरोपींबाबत 'हा'...

शरद पवारांच्या घरावर हल्ला : गुणरत्न सदावर्तेंना पोलीस कोठडी, इतर आरोपींबाबत ‘हा’ निर्णय

मुंबई | Mumbai

गुरुवारी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना (ST employees) उच्च न्यायालयाने (High Court) २२ एप्रिलपर्यंत कामावर हजर होण्याचे आदेश दिल्यानंतर संप (ST Workers Strike) मिटल्याचे चित्र निर्माण झाले होते.

- Advertisement -

मात्र शुक्रवारी दुपारी १०० हून अधिक कर्मचाऱ्यांच्या एका जत्थ्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या ‘सिल्व्हर ओक’ (Silver Oak) या बंगल्यावर हल्ला केला. याप्रकरणी पोलिसांनी (Police) कामगारांचे वकील गुणरत्न सदावर्तेंना (Adv Gunratna Sadavarte) अटक केली आहे. त्यानंतर, आज न्यायालयात (Court) हजर करण्यात आले.

न्यायालयाने गुणरत्न सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ११ एप्रिलपर्यंत सदावर्ते पोलीस कोठडीत असतील. तर अन्य १०९ आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

न्यायालयात काय घडलं?

वकिल प्रदीप घरत यांनी सरकारची बाजू न्यायालयात मांडली. गुणरत्न सदावर्ते यांच्या भाषणांचा उल्लेख त्यांनी न्यायालयात केला. भाषणात सदावर्ते यांनी शरद पवार यांच्यावर केलेली टीका आणि चिथावणीखोर भाषणाचाही युक्तिवादात विधिज्ञ घरत यांनी उल्लेख केला. सदावर्ते यांनी आंदोलकांची माथी भडकावण्याचे काम आहे असेही त्यांनी न्यायालयात सांगत या हल्ल्यात पोलिस जखमी झाले त्यामुळे गुणरत्न सदावर्तें यांना १४ दिवसांची पोलिस कोठडी द्यावी अशी मागणी न्यायालयाकडे केली.

दरम्यान सदावर्ते यांचे वकील विधिज्ञ वासवानी यांनी या कोठडीला विरोध केला. सदावर्ते घटनास्थळी नव्हते, सीसीटीव्हीतही ते दिसत नाहीत त्यांचा या प्रकरणाशी संबंधच नाही. पण गृहमंत्र्यांविरूद्ध तक्रार केल्याने या प्रकरणात सदावर्ते यांना गोवण्यात आले. पोलिस जखमी झाले तर त्यांचा अहवाल न्यायालयात सादर का झाला नाही असा सवालही वासवानी यांनी करीत न्यायालयापुढे आपली बाजू मांडली.

- Advertisment -

ताज्या बातम्या