Wednesday, April 24, 2024
Homeमुख्य बातम्यानाशिक पदवीधर निवडणूक : पहिल्या फेरीच्या मतमोजणीला सुरुवात

नाशिक पदवीधर निवडणूक : पहिल्या फेरीच्या मतमोजणीला सुरुवात

नाशिक | Nashik

नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूकीच्या (Nashik Graduate Constituency Election) मतमोजणीस (Vote Counting) आज सकाळी आठ वाजेपासून सुरूवात झाली होती. सुरुवातील मतपत्रिकांची छाननी करण्यात आली. त्यानंतर मतपत्रिकांचे वेगवेगळे गठ्ठे करून २८ टेबलांवर ठेवण्यात आले आहेत.

- Advertisement -

नाशिक पदवीधर निवडणूक : काँग्रेस, राष्ट्रवादीने प्रचार केला नाही? शुभांगी पाटील म्हणाल्या…

पहिल्या फेरीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून यातील पहिल्या काही मतपत्रिकांचा अंदाज घेतला असता सत्यजित तांबे (Satyajit Tambe) आणि महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांच्यामध्ये अटीटीची लढत होत असल्याचे चित्र सध्यातरी दिसून येत आहे.

दरम्यान, यासोबतच बाद मतपत्रिकांची (Ballot Papers) संख्या अधिक असल्याने आता कोटा किती निश्चित होतो? याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. कोटा निश्चितीनंतरच खऱ्या अर्थाने निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.

नाशिक पदवीधर निवडणूक : मतमोजणी केंद्रावर गोंधळ

- Advertisment -

ताज्या बातम्या