Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रसीबीआयकडून अनिल देशमुखांची नऊ तास चौकशी? हे प्रश्न विचारले ?

सीबीआयकडून अनिल देशमुखांची नऊ तास चौकशी? हे प्रश्न विचारले ?

मुंबई

माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करत लेटर बॉम्ब टाकला होता. या प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख चौकशी झाली. तब्बल ९ तास ही चौकशी झाली.

- Advertisement -

परमबीर सिंग यांच्या आरोपांमुळे अनिल देशमुख यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. शंभर कोटी वसुली प्रकरणासंदर्भात याचिका जयश्री पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली होती. याच आधारावर मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आज सकाळी दहाच्या सुमारास अनिल देशमुख सीबीआयच्या डी आर डी ओ या कार्यालय पोहोचले. सीबीआयने जवळपास ३० प्रश्नांची सूची तयार केली असून अनिल देशमुख यांना याच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर द्यावे लागणार आहे. त्याबद्दलचे हे संभाव्य प्रश्न…

१) आपण परमवीर सिंग यांना कधीपासून ओळखता?

२) परमवीर सिंग यांची मुंबई पोलीस आयुक्त पदी नियुक्ती होण्याआधी आपण परमवीर सिंग यांना किती वेळ भेटला?

३) परमवीर सिंग यांनी लिहिलेल्या या पत्राबाबत आपणास काय बोलायचे आहे?

४)आपल्यावर करण्यात आलेले आरोप आपल्याला मान्य आहेत का?

५) आपले दोन्ही खाजगी सचिव यांनी दिलेले हे जबाब आहेत हे आपण वाचून घ्यावेत आणि यांवर आपणास काय आक्षेप आहे का किंवा जबाब आपल्याला मान्य आहेत का?

६) परमवीर सिंग यांनी लिहिलेल्या पत्रात आपल्यावर करण्यात आलेले आरोप यावर आपण काय खुलासा कराल?

७) १०० कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश आपण दिले होते का?

८) सचिन वाजे याच्या नियुक्ती करता त्याने तुमची भेट घेतली होती का?

९)मुंबई पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांना आपण वसुली करण्यास सांगितले होते याबाबत गंभीर आरोप परमवीर सिंग यांनी त्यांच्या पत्रात केला आहे?

१०) अशाप्रकारे शंभर कोटींची वसुली केली जाते का याबाबत आपल्याला काय माहिती आहे?

- Advertisment -

ताज्या बातम्या