Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्यालाचखोर सरपंच ‘एसीबी’च्या जाळ्यात

लाचखोर सरपंच ‘एसीबी’च्या जाळ्यात

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

शिवस्मारक उद्यान चौकाचे केलेल्या सुशोभिकरणाचे काम पुर्तता प्रमाणपत्र (Certificate of fulfillment) ग्रामपंचायतीकडून घेण्यासाठी 20 हजाराची लाच खाजगी इसमाच्या हस्ते स्विकारणार्‍या देवळा तालुक्यातील

- Advertisement -

चिंचवे निं. येथील ग्रामपंचायत सरपंच रविंद्र शंकर पवार (40) व लाच घेणारा त्यांचा मध्यस्थ साथीदार किशोर माणिक पवार (40) या दोघांना आज नाशिक (nashik) येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Bribery Prevention Department) पथकाने सापळा लावून जेरबंद केले. लाच घेतांना थेट सरपंचास पथकातर्फे पकडण्यात आल्यामुळे संपुर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक वृत्त असे की, देवळा तालुक्यातील (deola taluka) चिंचवे (chinchave) निं. या गावात शिवस्मारक उद्यान चौकाच्या सुशोभिकरणाचे काम (work of beautification) तक्रारदार ठेकेदारातर्फे करण्यात आले होते.

नियमानुसार निविदा प्रक्रियेव्दारे हे काम संबंधित ठेकेदाराने केले होते. मात्र काम पुर्तता प्रमाणपत्र ग्रामपंचायतीकडून मिळणे गरजेचे असल्याने संबंधित ठेकेदाराने सरपंचाकडे (sarpancha) प्रमाणपत्राची मागणी केली असता कामाच्या एकुण रक्कमेतून पाच टक्के सुमारे 22 हजार रूपयांची लाच सरपंच रविंद्र पवार (Sarpancha Ravindra Pawar) यांनी मागितली होती.

नियमानुसार काम करून देखील सरपंच लाच मागत असल्याने ठेकेदाराने या संदर्भात नाशिक येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीची शहनिशा केल्यानंतर लाचलुचपत विभागाचे पोलीस अधिक्षक सुनिल कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पो.नि. साधना भोये बेलगावकर, संदीप साळुंके व पथकाने सापळा रचला होता.

सरपंचाबरोबर झालेल्या तडजोडीत 20 हजार रूपये देण्याचे ठरल्याने ठेकेदाराने सरपंचाने सुचविलेला खाजगी इसम किशोर माणिक पवार याच्याकडे 20 हजार रूपये देताच सापळा ठेवून असलेल्या पथकाने किशोर पवार यास ताब्यात घेतल्यानंतर सरपंच रविंद्र पवार यांना देखील ताब्यात घेण्याची कारवाई केली. या दोघांविरूध्द देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई रात्री उशीरापर्यंत सुरू होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या