Monday, April 29, 2024
Homeनाशिकशिवसेना नाशिक महानगरप्रमुखपदी नगरसेवक सुधाकर बडगुजर

शिवसेना नाशिक महानगरप्रमुखपदी नगरसेवक सुधाकर बडगुजर

नाशिक | प्रतिनिधी

आगामी नाशिक महापालिका निवडणुक लक्षात घेऊन शिवसेनेत महत्वपुर्ण बदलाचे संकेत दिले जात असतांनाच, शिवसेना नाशिक महानगर प्रमुख म्हणुन शिवसेना जेष्ठ नगरसेवक सुधाकर बडगुजर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यानिवडीमुळे शिवसेनेतील मरगळ दूर होणार असुन आगामी महापालिका निवडणुकीत महापालिकेवर सेनेचा भगवा फडकाविण्याची जबाबदारी बडगुजर यांच्यासह पदाधिकार्‍यावर आली आहे…

- Advertisement -

नाशिक दोन वर्षापुर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिक महानगरप्रमुख पदावर सचिन मराठे व महेश बडगे यांची यांची नियुक्त करण्यात आली होती. यावेळी सेनेतील गटबाजी समोर आली होती. या निवडीनंतर दोन्ही पदाधिकार्‍यांकडुन गेल्या काळात फारशी आंदोलने झाली नाही.

ठराविक कार्यक्रम वगळता सेना संघटन बळकटीसाठी जाणिवपुर्वक प्रयत्न झाले नाही. नाशिक महापालिका निवडणुक काही महिन्यांवर येऊन ठेपली असतांना देखील संपर्क प्रमुखांच्या बैठकीशिवाय महानगर पदाधिकार्‍यांकडुन कोणतेही काम झाले नव्हते. या एकुण प्रकाराची दखल घेत सेना पक्ष प्रमुखांकडुन शिवसेना नाशिक महानगरप्रमुख पदी सुधाकर बडगुजर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

काही दिवसापुर्वी शिवसेना नेते संजय राऊत यांनी नाशिक दौर्‍यात बडगुजर यांच्या नावावर शिक्कामार्तेब केला असतांना आज मुंबईतून बडगुजर यांच्या नावाची घोषणा झाली आहे. त्यांच्या निवडीने पदाधिकारी व शिवसैनिकांत आनंदाचे वातावरण पसरले आहे.

नाशिक महापालिकेवर शिवसेनेची सत्ता असतांना त्यांनी सभागृह नेते पदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे. तसेच मागील पंचवार्षिक काळात महानगरपालिका विराधी पक्षनेते म्हणुन जबाबदारी सांभाळली आहे.

नवीन नाशिक विभागात विविध सामाजिक उपक्रम राबवित त्यांनी मोठा जनसंग्रह तयार केला आहे. या भागातील सेनेचे वर्चस्व कायम ठेवण्यात त्यांना यश आले आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत सेनेकडुन महापौर पदाची निवडणुक त्यांनी लढविली होती.

- Advertisment -

ताज्या बातम्या