मनपाचे जलतरण तलाव सुरू होणार

स्विमिंग असोसिएशनच्या मागणीला यश
मनपाचे जलतरण तलाव सुरू होणार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

करोना ( Corona ) निर्बंधांमुळे गत सुमारे दोन वर्षे बंद असलेले महापालिकेचे सर्व जलतरण तलाव ( NMC Swimming pool ) लवकरच सुरू होणार आहे. यामुळे जलतरण पटूंसोबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.

4 एप्रिल रोजी या मागणीसाठी नाशिक स्विमिंग असोसिएशनच्या (Nashik Swimming Association ) वतीने महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले होते. तसेच प्रशासन उपायुक्त मनोज घोडे पाटील यांच्याशी चर्चा करून पाटील यांनी एका आठवड्यात स्विमिंग टोल सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार मंगळवारपासून शहरातील सर्व जलतरण तलाव सुरू होणार आहे.

नाशिक महानगरपालिका अंतर्गत असलेल्या जलतरण तलाव करोनामुळे बंद होते. या काळा मध्ये विद्यार्थी तसेच आरोग्याची काळजी घेणार्‍या नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक यांच्या पत्रानुसार शॉपिंग कॉम्प्लेक्स, सिनेमा हॉल, ग्राउंड स्विमिंग पूल, धार्मिक स्थळे आदी 100% क्षमतेने सुरु करण्यास परवानगी दिली आहे.म्हणून मनपा अंतर्गत असलेले सर्व जलतरण तलाव पूर्ण क्षमतेने सुरु करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती .

त्यानुसार मंगळवारपासून शहरातील सर्व महापालिकेच्या जलतरण तलाव सुरू होणार आहे. स्विमिंग असोसिएशन ऑफ नाशिकचे सचिव राजेंद्र निंबाळते, माजी नगरसेवक प्रथमेश गीते आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.