मनपाचा शांतता झोन कागदावरच

मनपाचा शांतता झोन कागदावरच
USER

नाशिक । प्रतिनिधी Nashik

सध्या देशभरात भोंगा ( Loud Speakrs ) हा विषय चांगलाच गाजत आहे, तर दुसरीकडे सायलेन्स झोन (Silence zone ) देखील चर्चेचा विषय ठरला आहे. भोंग्याच्या राजकारणाने ध्वनीप्रदूषणाचा (Noise pollution )विषय चर्चेत आला असला तरी सध्या नाशिक मनपाने निश्चित केलेल्या सुमारे 19 शांतता झोनची वाटच लागल्याचे दिसत आहे.मुंबई, आग्रा , नाशिक, पुणे आणि औरंगाबाद असे राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग नाशिक शहरातून जातात. त्यावर दिवसरात्र 24 तास वाहन धावत असतात. त्यामुळे या सगळ्या मार्गावर ध्वनिप्रदूषण कायम जास्त असते.

महापालिकेने नोव्हेंबर 2009 मध्ये शहरात 19 शांतता झोन जाहीर केले आहेत. त्या भागात फक्त 40 ते 45 डेसीबल इतकेच ध्वनिप्रदूषण असते, असा त्याचा अर्थ आहे.वास्तव मात्र वेगळेच आहे.या सगळ्या शांतता झोनवर इतके ध्वनिप्रदूषण वाढले आहे की, एकही झोन शांतता झोन राहिलेला नसल्याचे दिसून येत आहे.

20 लाखाच्या जवळपास नाशिकची लोकसंख्या झाली तरी अजूनही शांतता झोन कागदावरच दिसत असल्याचे चित्र आहे. प्रदूषण नियंत्रण विभागाच्या निकषानुसार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शांतता झोनमध्ये ध्वनिप्रदूषणाची तीव्रता 40 ते 45 डेसीबल इतकीच असेल तर तो शांतता झोन. तसे नसेल तर तो व्यवसायीक किंवा औद्योगिक झोनच्या नियमात येतो.

शहरातील शांतता झोन

जिल्हा सत्र न्यायालय, एचपीटी बीवायके कॅम्पस,आदिवासी विकास भवन, केटीएचएम कॅम्पस, फ्रवशी अकादमी, लिटील वंडर हायस्कूल,जिल्हा रुग्णालय, पोलीस आयुक्तालय, आदर्श विद्यालय उत्तमनगर, पेठे विद्यालय त्रिमूर्ती चौक, सुयश रुग्णालय परिसर, व्होक्हार्ट हॉस्पीटल,सेंट झेवियर्स हायस्कूल,कोठारी कन्या विद्यालय, नाशिक रोड न्यायालय, जयराम हॉस्पीटल हे शांतता झोन आहेत, मात्र या पैकी एकही झोनवर कधी ध्वनीप्रदूषण कमी नसते.दिवसरात्र लहान मोठ्या वाहनांची ये-जा आणि गाड्यांच्या हॉर्नचे एवढे आवाज असतात की, हे नाशिकला खरोखरच शांतता झोन राहिले का? असा प्रश्न निर्माण होतो.

Related Stories

No stories found.