Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्याकर वसुलीसाठी मनपाची 'अभय योजना'

कर वसुलीसाठी मनपाची ‘अभय योजना’

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक महापालिका क्षेत्रात अनेक वर्षापासून ठराविक मालमत्ताधारकांकडून घरपट्टी भरली जात नसल्याने थकबाकीचे प्रमाण वाढत असतांनाच आता करोनाचा मोठा परिणाम वसुलीवर झाला आहे.

- Advertisement -

यामुळेच आता घरपट्टी थकबाकी वसुलीसाठी महापालिकेकडून अभय योजना राबविण्याचा विचार सुरू आहे. पुढील महिन्यापासून ही योजना राबविण्यात येणार आहे.

नाशिक महापालिकेकडून घरपट्टी थकबाकी वसुलीसाठी गेल्या दोन -तीन वर्षापासून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले आहे. थकबाकीचा आकडा मोठा असल्याने ती वसुलीसाठी थकबाकीदारांच्या घरासमोर ढोल बजाव केल्यानंतर प्रशासनाने काही मालमत्ता जप्त करण्याची कारवाई केली.

त्यानंतरच्या काळात जप्त मालमत्तांचा लिलाव करण्यात आला. लिलाव घेण्यासाठी कोणीच पुढे न आल्याने महापालिकेकडुन मालमत्ता स्वत:च घेत त्यावर नाव लावण्याची प्रक्रिया देखील केली होती.

या एकुणच प्रयत्नानंतर आता मार्च महिन्यापासुन आलेल्या करोनाचा मोठा फटका घरपट्टी वसुलीला बसल्यानंतर घरपट्टी वसुलीला थंड प्रतिसाद मिळत आहे. परिणामी घरपट्टी थकबाकीचा आकडा आता 200 कोटींपर्यत जाऊन पोहचला आहे.

आता करोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या नवीन आर्थिक वर्षात नियमित घरपट्टी भरणार्‍यांना 5 ते 2 टक्क्यापर्यत सवलत देण्याचे काम केले. मात्र थकबाकी वसुलीसाठी आता महापालिका प्रशासनाकडुन अभय योजना राबविण्याचा विचार सुरू आहे.

या अभय योजनेमार्फत थकबाकीधारकांना दंडात मोठी सवलत दिली जाणार असुन या सवलतीच्या माध्यमातून थकबाकीचा आकडा कमी करण्यासाठी प्रंयत्न केला जाणार आहे.

अशी आहे अभय योजना

पुढील नोव्हेंबर महिन्यापासुन ही अभय योजना राबविली जाणार आहे. यात मालमत्ता कराच्या थकबाकीदारांना करण्यात आलेल्या दंडात पहिल्या महिन्यात 75 टक्के सवलत दिली जाणार आहे. नंतरच्या दुसर्‍या महिन्यात दंडात 50 टक्के आणि शेवटच्या महिन्यात 25 टक्के सवलत दिली जाणार आहे.

योजना अंतिम करण्याचे काम

मनपाची पुर्वीची घरपट्टीची थकबाकी आणि करोनामुळे थकलेली घरपट्टी याची आकडेवारी वाढली असल्याने आता अभय योजना राबविली जाणार आहे. मागील वर्षात अभय योजना राबविण्यात आल्याचे चांगली वसुली झाल्याने आता पुन्हा योजना निश्चितीचे काम सुरू असुन लवकरच यासंदर्भातील माहिती नागरिकांना दिली जाणार असल्याची माहिती कर विभागाचे उपायुक्त प्रदिप चौधरी यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या