मनपा उभारणार चार्जिंग स्टेशन्स

मनपा उभारणार चार्जिंग स्टेशन्स

नाशिक । प्रतिनिधी Nashik

मनपा प्रशासन NMC Administration इलेक्ट्रिक वाहन धोरणाची अंमलबजावणी Implementation of electric vehicle policy करणार असून, यापुढे स्वतः इलेक्ट्रिक वाहने खरेदी करणार आहे. इलेक्ट्रिक वाहने वापरण्याच्या दृष्टीने प्रोत्साहन देण्याकरिता शहरात महापालिका विविध ठिकाणी चार्जिंग स्टेशन्स Charging Stations उभारणार आहे.

मनपाच्या विविध विभागांत सेवा देण्यासाठी मोठ्या स्वरूपाची इलेक्ट्रिक वाहने Electrical vehicles तूर्तास उपलब्ध नसल्याने पर्यावरणपूरक सीएनजी इंधनावरील वाहने खरेदी करण्याची योजना आहे. या धोरणाची अंमलबजावणी नाशिक महापालिकेलाही बंधनकारक करण्यात आली आहे. या संदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेवर सादर होणार आहे. राज्य शासनाच्याधोरणानुसार 1 एप्रिल 2022 पासून शहरांतर्गत सर्व शासकीय-निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत व शासनाच्या निधीतून खरेदी होणारी वाहने बॅटरीवर चालणारी इलेक्ट्रिक वाहने असणार आहेत.

सद्यस्थितीत महापालिकेच्या विविध विभागांत सेवा देणारी वाहनेतसेच पदाधिकारी आणि अधिकार्यांकडील शासकीय कामकाजासाठी वापरली जाणारी वाहने पेट्रोल-डिझेल इंधनावरील आहेत. परंतु, आता महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी महापालिकेने इलेक्ट्रिक वाहने खरेदीसाठी पावले उचलत आहेत. दरम्यान, शहरातील महत्त्वाचे व गर्दीची ठिकाणे असलेल्या बसस्थानके, रेल्वेस्थानक रुग्णालये, सिटीलिक कार्यालय अशा ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारली जाणार आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com