Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशCOVID19 : करोनाची धडकी भरवणारी आकडेवारी!

COVID19 : करोनाची धडकी भरवणारी आकडेवारी!

दिल्ली | Delhi

भारतात गेल्या काही दिवसांपासून करोनाने कहर केला असून दैनंदिन रुग्णसंख्येने उच्चाकं गाठले आहेत. भारतात गेल्या आठवड्यापासून दैनंदिन रुग्णसंख्येत होणारी वाढ अद्यापही कायम असून गुरुवारी २४ तासांमध्ये तब्बल ३ लाखांहून नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्याही चिंता वाढवणारी ठरत आहे.

- Advertisement -

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत आतापर्यंतच्या सर्वाधिक मृत्यूंची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत ३ हजार ४९८ रुग्णांनी आपला जीव गमावला असून हा आतापर्यंतचा उच्चांक आहे.

देशात गेल्या २४ तासांत ३ लाख ८६ हजार ४५२ नवे करोना रुग्ण आढळले असून यासोबत देशातील कोरोना रुग्णसंख्या १ कोटी ८७ लाख ६२ हजार ९७६ इतकी झाली आहे. तर दुसरीकडे आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २ लाख ०८ हजार ३३० वर पोहोचली आहे.

दरम्यान देशात गेल्या २४ तासात २ लाख ९७ हजार ५४० रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. या संख्येसह करोनावर मात करणाऱ्यांची संख्या १ कोटी ५३ लाख ८४ हजार ४१८ वर पोहचली आहे.

महाराष्ट्रातील स्थिती काय?

राज्यात काल ६६ हजार १५९ कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या ४५ लाख ३९ हजार ५५३ झाली आहे. काल ७७१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गाने दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या ६७ हजार ९८५ झाली असून मृत्यूदर १.५ टक्के झाला आहे.

काल ६८ हजार ५३७ रुग्ण या करोनामुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ३७ लाख ९९ हजार २६६ रुग्ण, करोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यभरात सहा लाख ७० हजार ३०१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

‘या’ देशाचा नागरिकांना भारत सोडण्याचा सल्ला

भारतात दुसऱ्या लाटेमुळे करोना संसर्गाचं प्रमाण प्रचंड वेगाने वाढत आहे. त्यात भर म्हणजे मृतांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे भीतीदायक दृश्य देशात निर्माण झालं आहे. रुग्णांसह नातेवाईकांचे अतोनात हाल होत आहे. त्यातच ऑक्सिजन, रेमडेसिविर अशा अनेक गोष्टींची भारताला कमतरता जाणवत असून अमेरिका, रशियासह अनेक देशांकडून मदत केली जात आहे. दरम्यान देशात रुग्णसंख्या वाढत असल्याने अनेक राज्यांमध्ये बेड उपलब्ध होणंही कठीण झालं असून आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. भारतातील ही परिस्थिती पाहता अमेरिकेने आपल्या नागरिकांना तात्काळ मायदेशी परतण्यास सांगितलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या