काळजी घ्या! देशात गेल्या २४ तासात ३.७९ लाख रुग्णांची नोंद, ३६४५ मृत्यू

jalgaon-digital
2 Min Read

दिल्ली | Delhi

देशात करोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. देशातील करोनाबाधितांची संख्या दिवसागणिक नवनवे उच्चांक गाठत आहे. त्याचबरोबर करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मृत्यूदरातही वाढ होत आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत आतापर्यंतच्या सर्वाधिक मृत्यूंची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत ३ हजार ६४५ रुग्णांनी आपला जीव गमावला असून हा आतापर्यंतचा उच्चांक आहे.

देशात गेल्या २४ तासांत ३ लाख ७९ हजार २५७ नवे करोना रुग्ण आढळले असून यासोबत देशातील कोरोना रुग्णसंख्या १ कोटी ८३ लाख ७६ हजार ५२४ इतकी झाली आहे. तर दुसरीकडे आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २ लाख ०४ हजार ८३२ वर पोहोचली आहे.

दरम्यान देशात गेल्या २४ तासात २ लाख ६९ हजार ५०७ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. या संख्येसह करोनावर मात करणाऱ्यांची संख्या १ कोटी ५० लाख ८६ हजार ८७८ वर पोहचली आहे.

करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर चाचण्यांचे प्रमाणही वाढवण्यात आले आहे. आतापर्यंत २८ कोटी ४४ लाख ७१ हजार ९७९ चाचण्या करण्यात आल्या आहेत. बुधवारी एका दिवसात १७ लाख ६८ हजार १९० जणांची करोना चाचणी करण्यात आल्याची माहिती ICMR ने दिली आहे.

महाराष्ट्रातील स्थिती काय?

महाराष्ट्रात बुधवारी ६३ हजार ३०९ लोकांना करोनाची लागण झाली, तर ९८५ जणांचा करोनाने मृत्यू झाला. आतापर्यंत महाराष्ट्रात ४४ लाख ७३ हजार ३९४ करोना रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत ६१ हजार १८१ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. राज्यात सध्या करोनाचे ६ लाख ७३ हजार ४८१ सक्रिय रुग्ण आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *