Friday, April 26, 2024
Homeमुख्य बातम्याभारतात करोनाचा उद्रेक सुरूच, गेल्या २४ तासांत १.३१ लाख रुग्ण

भारतात करोनाचा उद्रेक सुरूच, गेल्या २४ तासांत १.३१ लाख रुग्ण

दिल्ली | Delhi

करोनाचा उद्रेक दिवसागणिक वाढताना दिसून येत आहे. दररोज मोठ्या संख्येने नवीन करोनाबाधित सापडत आहे. देशात गेल्या २४ तासात करोना रुग्णवाढीचा उच्चांक नोंदवला गेला आहे.

- Advertisement -

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात देशात तब्बल १ लाख ३१ हजार ९६८ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील एकूण रुग्ण संख्या १ कोटी ३० लाख ६० हजार ५४२ इतकी झाली आहे.

तसेच गेल्या २४ तासात ६१ हजार ८९९ जण उपचारानंतर बरे झाले असून ७८० जणांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत १ कोटी १९ लाख १२ हजार २९२ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशात सक्रिय रुग्णाची संख्या ९ लाख ७९ हजार ६०८ इतकी झाली असून मृतांची संख्या १ लाख ६७ हजार ६४२ इतकी झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या