Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशCoronavirus : देशातील एकूण रुग्णसंख्या २ कोटींवर

Coronavirus : देशातील एकूण रुग्णसंख्या २ कोटींवर

दिल्ली l Delhi

भारतात मागील दोन दिवसांपासून दररोज आढळणाऱ्या नवीन करोना रुग्णांच्या संख्येत थोड्या प्रमाणात घट दिसून येत आहे. त्यामुळे करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं काहीसं चित्र दिसत आहे. मात्र असे असले तरी देशातील एकूण रुग्णसंख्या दोन कोटींहून अधिक झाली आहे. तसेच दररोज होणाऱ्या मृत्यू संख्येचा वेग कायम असल्याचं आकेडवारीवरून स्पष्ट झालं आहे.

- Advertisement -

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ३ लाख ५७ हजार २२९ नवे करोना रुग्ण आढळले असून यासोबत देशातील करोना रुग्णसंख्या २ कोटी ०२ लाख ८२ हजार ८३३ इतकी झाली आहे.

Petrol Diesel Price : नागरिकांच्या खिशाला कात्री! पेट्रोल-डिझेलचे दर वाढले

तर गेल्या २४ तासांमध्ये ३ हजार ४९९ रुग्णांचा मृत्यू झाला असून दुसरीकडे आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २ लाख २२ हजार ४०८ वर पोहोचली आहे. करोना मृत्यूंच्या यादीत जगात भारत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. या यादीत अमेरिका (५,९१,०६२) पहिल्या क्रमांकावर आहे, तर ब्राझील (४,०७,७७५) दुसऱ्या क्रमांकावर आहे.

दरम्यान, देशात गेल्या २४ तासात ३ लाख २० हजार २८९ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. या संख्येसह करोनावर मात करणाऱ्यांची संख्या १ कोटी ६६ लाख १३ हजार २९२ वर पोहचली आहे.

महाराष्ट्रातील स्थिती काय?

राज्यात सोमवारी करोनाबाधित रुग्णसंख्येत काहीशी घट झाली आहे. राज्यात काल ४८ हजार ६२१ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. तर ५९ हजार ५०० करोनमुक्त झाले आहे. राज्यात कालपर्यंत एकूण ४० लाख ४१ हजार १५८ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या ६ लाख ५६ हजार ८७० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत ७० हजार ८५१ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान काल ५६७ करोनाबाधित रुग्णांनी आपला जीव गमावला.

- Advertisment -

ताज्या बातम्या