...तर राज्यातील बार, दारुची दुकाने बंद

...तर राज्यातील बार, दारुची दुकाने बंद
आरोग्यमंत्री राजेश टोपे

राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढतच आहे. कोरोनाचा संसर्ग (Corona infection) रोखण्यासाठी गर्दी होऊ न देणे हा उपाय आहे. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister uddhav thackeray) यांनी निर्बंध लागू केले आहेत. मात्र, बार आणि दारूच्या दुकानांवर गर्दी होत असेल तर ते ही बंद करावी लागतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे
राज्याची सुधारित नियमावली: जीम, ब्युटी पार्लर अन् सलूनसाठी हे असतील नियम

सध्या राज्यात रोज 40 हजारांपेक्षा अधिक रूग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे कोरोनाचा वाढत संसर्ग रोखण्यासाठी ज्या ठिकाणी गर्दी होईल येथे निर्बंध लावले जातील. राज्यात रविवारीपासून निर्बंध लागू होणार आहेत. त्यामुळे या निर्बंधाचे नागरिकांनी पालन करावे. सध्या राज्यातील ऑक्सिजनची मागणी 270 मेट्रिक टनावरुन 350 मेट्रिक टन इतकी झाली आहे. मात्र, हे कोव्हिड (Covid) आणि नॉन-कोव्हिड रुग्णांसाठी (Non-Covid patient) लागणाऱ्या एकूण ऑक्सिजनचे प्रमाण आहे. यापूर्वी कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत आपण दिवसाला लागणाऱ्या 1700 ते 1800 मेट्रिक टनची मागणी पूर्ण केली आहे. सध्या रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना कमी प्रमाणात ऑक्सिजनची गरज लागत आहे. त्यावरुन सध्याचा कोरोना विषाणू (Corona Virus) सौम्य वाटत असल्याचे राजेश टोपे यांनी म्हटले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com