Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशCoronavirus : करोनाची दुसरी लाट ओसरतेय, वाचा आजची आकडेवारी

Coronavirus : करोनाची दुसरी लाट ओसरतेय, वाचा आजची आकडेवारी

दिल्ली | Delhi

देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला असताना गेल्या काही दिवसांपासून करोना रूग्णांच्या संख्येत घट दिसून येत आहे. देशात ४४ दिवसांनी करोनाबाधितांची सर्वात कमी संख्या नोंदवण्यात आली आहे.

- Advertisement -

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत १ लाख ८६ हजार ३६४ नवे करोना रुग्ण आढळले असून ३ हजार ६६० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. देशातील एकूण करोना रुग्णसंख्या २ कोटी ७५ लाख ५५ हजार ४५७ इतकी झाली आहे.

हवेतूनही पसरतोय करोना

तर आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ३ लाख १८ हजार ८९५ वर पोहोचली आहे. तसेच देशात गेल्या २४ तासात २ लाख ५९ हजार ४५९ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. या संख्येसह करोनावर मात करणाऱ्यांची संख्या २ कोटी ४८ लाख ९३ हजार ४१० वर पोहचली आहे.

महाराष्ट्रातील स्थिती काय?

राज्यात काल २१ हजार २७३ नवे रुग्ण आढळून आले असून ४२५ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ३४ हजार ३७० रुग्णांनी करोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील एकूण बर्‍या झालेल्या रुग्णांचा आकडा ५२ लाख ७६ हजार २०३ इतका झाला आहे. राज्यातील रिकव्हरी रेट ९३.०२ टक्के इतका आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या