Saturday, April 27, 2024
Homeदेश विदेशCOVID19 : भारतात सलग दुसऱ्या दिवशी दैनंदिन रुग्णसंख्या एक लाखापेक्षा कमी, महाराष्ट्रातील...

COVID19 : भारतात सलग दुसऱ्या दिवशी दैनंदिन रुग्णसंख्या एक लाखापेक्षा कमी, महाराष्ट्रातील स्थिती काय?

दिल्ली | Delhi

देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेना देशात हाहाकार माजवला होता. करोना रुग्णसंख्येने मोठा उच्चांक गाठला होता. दरम्यान देशातील नव्या करोना रुग्णांची संख्या घटत असल्याने करोनाची दुसरी लाट आता बर्‍यापैकी नियंत्रणात आली आहे. तसेच मृताची संख्याही घटत असल्याचेही समोर आलं आहे.

- Advertisement -

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ९२ हजार ५९६ नवे करोना रुग्ण आढळले असून २ हजार २१९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. देशातील एकूण करोना रुग्णसंख्या २ कोटी ९० लाख ८९ हजार ०६९ इतकी झाली आहे.

तर आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ३ लाख ५३ हजार ५२८ वर पोहोचली आहे. तसेच देशात गेल्या २४ तासात १ लाख ६२ हजार ६६४ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. या संख्येसह करोनावर मात करणाऱ्यांची संख्या २ कोटी ७५ लाख ०४ हजार १२६ वर पोहचली आहे.

महाराष्ट्रातील स्थिती काय?

राज्यात काल दिवसभरात १६ हजार ५७७ रूग्ण करोनातून बरे झाले. तर, १० हजार ८९१ नवीन करोनाबाधित आढळून आले. २९५ करोनाबाधितांच्या मृ्त्यूची नोंद झाली. राज्यात आजपर्यंत एकूण ५५,८०,९२५ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९५.३५ टक्के झाले आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर १.७३ टक्के इतका आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या