Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशदिलासादायक! भारतात दैनंदिन करोना रुग्णसंख्येत घट कायम; रिकव्हरी रेट ९२ टक्क्यांच्या पुढे

दिलासादायक! भारतात दैनंदिन करोना रुग्णसंख्येत घट कायम; रिकव्हरी रेट ९२ टक्क्यांच्या पुढे

दिल्ली | Delhi

देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेना देशात हाहाकार माजवला होता. करोना रुग्णसंख्येने मोठा उच्चांक गाठला होता. दरम्यान, या लाटेचा प्रभाव हळूहळू कमी होत आहे. देशातून करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याची चिन्हे आकडेवारीतून दिसत आहेत.

- Advertisement -

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत १ लाख २७ हजार ५१० नवे करोना रुग्ण आढळले असून २ हजार ७९५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. देशातील एकूण करोना रुग्णसंख्या २ कोटी ८१ लाख ७५ हजार ०४४ इतकी झाली आहे. तर आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ३ लाख ३१ हजार ८९५ वर पोहोचली आहे. तसेच देशात गेल्या २४ तासात २ लाख ५५ हजार २८७ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. या संख्येसह करोनावर मात करणाऱ्यांची संख्या २ कोटी ५९ लाख ४७ हजार ६२९ वर पोहचली आहे.

देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.०९ टक्के झाले आहेत. साप्ताहिक पॉझिटिव्हीटी रेट ८.६४ टक्के असून दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट ६.६२ टक्के इतका आहे.

दरम्यान करोनाला रोखण्यासाठी देशात लसीकरण करण्यात येत आहे. मात्र लशींच्या तुटवड्यामुळे नागरीकांचे हाल होत आहेत. देशात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेदरम्यान आतापर्यंत एकूण २१ कोटी ६० लाख ४६ हजार ६३८ लसीचे डोस देण्यात आले आहेत. यातील २७ लाख ८० हजार ०५८ लसीचे डोस सोमवारी देण्यात आले.

तसेच ICMR दिलेल्या माहितीनुसार, ३१ मे २०२१ पर्यंत देशात एकूण ३४ कोटी ६७ लाख ९२ हजार २५७ नमुन्यांची चाचणी करण्यात आलीय. यातील १९ लाख २५ हजार ३७४ नमुन्यांची करोना चाचणी कालच्या एकाच दिवसात करण्यात आली.

महाराष्ट्रातील स्थिती काय?

करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांनी कडक लॉकडाऊन जाहीर केले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्राचादेखील समावेश आहे. महाराष्ट्रात शहरी भागात करोना रूग्णसंख्या आटोक्यात असली तरीही ग्रामीण भागात रूग्ण वाढत असल्याने अद्यापही ब्रेक द चेन अंतर्गत नियम कडक आहे. राज्यात काल दिवसभरात आढळलेल्या करोनाबाधितांपेक्षा दुपटीहून अधिक रूग्ण करोनातून बरे झाल्याचे दिलासादायक वृत्त समोर आले.

राज्यात काल १५ हजार ७७ नवीन करोनाबाधित आढळले असून, ३३ हजार रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. तर, १८४ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ५३ लोख ९५ हजार ३७० करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९३.८८ टक्के एवढे झाले आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर १.६६ टक्के एवढा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या