COVID19 : भारतात सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट मात्र मृतांची संख्या चिंताजनक

महाराष्ट्रातील स्थिती काय?
COVID19 : भारतात सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट मात्र मृतांची संख्या चिंताजनक

दिल्ली | Delhi

भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार पाहायला मिळत आहे. काही दिवसांपासून दैनंदिन करोनाबाधितांच्या संख्येत काहीशा प्रमाणात घट झाली असली तरी महिनाभरापासून करोना रुग्णांच्या मृत्यूचं तांडव सुरु आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशात दररोज चार हजारांच्या आसपास करोना रुग्णांचा मृत्यू होत आहे. गेल्या २४ तासात चार हजाराहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत २ लाख ५७ हजार २९९ नवे करोना रुग्ण आढळले असून ४ हजार १९४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. देशातील एकूण करोना रुग्णसंख्या २ कोटी ६२ लाख ८९ हजार २९० इतकी झाली आहे.

तर आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २ लाख ९५ हजार ५२५ वर पोहोचली आहे. तसेच देशात गेल्या २४ तासात ३ लाख ५७ हजार ६३० रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. या संख्येसह करोनावर मात करणाऱ्यांची संख्या २ कोटी ३० लाख ७० हजार ३६५ वर पोहचली आहे.

देशात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेदरम्यान आतापर्यंत एकूण १९ कोटी ३३ लाख ७२ हजार ८१९ लसीचे डोस देण्यात आले आहेत. यातील १४ लाख ५८ हजार ८९५ लसीचे डोस शुक्रवारी देण्यात आले.

महाराष्ट्रातील स्थिती काय?

राज्यात काल दिवसभरात २९ हजार ६४४ नवीन करोनाबाधित आढळून आले, तर ४४ हजार ४९३ रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. दिवसभरात ५५५ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ५० लाख लाख ७० हजार ८०१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.७४ टक्के एवढे झाले आहे. तर, राज्यात आजपर्यंत ८६ हजार ६१८ रूग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर १.५७% एवढा आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com