COVID19 : भारतात आज २.११ लाख नवे रुग्ण; महाराष्ट्रातील स्थिती काय?

COVID19 : भारतात आज २.११ लाख नवे रुग्ण; महाराष्ट्रातील स्थिती काय?

लहान मुलांना असलेला करोनाचा धोका वाढला

दिल्ली | Delhi

देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला असताना गेल्या काही दिवसांपासून करोना रूग्णांच्या संख्येत घट दिसून येत होती. मात्र गेल्या काही दिवसांत कमी झालेली रुग्णसंख्य़ा काही अंशी पुन्हा वाढली आहे. देशात सलग दुसऱ्या दिवशी नव्या करोनाबाधित रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे यला मिळत आहे. कालच्या तुलनेत आज ३ हजारांनी वाढ झाली आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत २ लाख ११ हजार २९८ नवे करोना रुग्ण आढळले असून ३ हजार ८४७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. देशातील एकूण करोना रुग्णसंख्या २ कोटी ७३ लाख ६९ हजार ०९३ इतकी झाली आहे.

COVID19 : भारतात आज २.११ लाख नवे रुग्ण; महाराष्ट्रातील स्थिती काय?
हवेतूनही पसरतोय करोना

तर आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ३ लाख १५ हजार २३५ वर पोहोचली आहे. तसेच देशात गेल्या २४ तासात २ लाख ८३ हजार १३५ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. या संख्येसह करोनावर मात करणाऱ्यांची संख्या २ कोटी ४६ लाख ३३ हजार ९५१ वर पोहचली आहे.

दरम्यान देशातील मृत्यूदर १.५ टक्क्यांवर आहे, तर रिकव्हरी रेट ८९ टक्क्यांहून अधिक आहे. भारतात सक्रिय रुग्णसंख्येत घट होऊन १० टक्क्यांहून कमी झाली आहे. सक्रिय रुग्णांच्या संख्येत भारत जगात दुसऱ्या स्थानी आहे. एकूण बाधितांच्या संख्येबाबत भारत जगात दुसऱ्या स्थानी आहे. तर जगभरात अमेरिका, ब्राझीलनंतर सर्वाधिक मृत्यू भारतात झाले आहेत.

महाराष्ट्रातील स्थिती काय?

राज्यातील करोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक कमी होत आहे. एप्रिलच्या मध्यावर करोना रुग्णांचा आकडा ७० हजारांच्या पुढे गेला होता. आता तोच आकडा ३० हजारांच्या खाली आला आहे. गेल्या दीड महिन्यापासून राज्यात कठोर निर्बंध लागू असल्यानं करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे मोठ्या शहरांमधील रुग्णसंख्या घटली आहे.

मात्र लहान मुलांना असलेला करोनाचा धोका वाढला. मे महिना संपायला अद्याप चार दिवस शिल्लक आहेत. मात्र आतापर्यंत ३४ हजार ४८६ लहानग्यांना करोनाची लागण झाली आहे. हा आकडा सातत्यानं वाढत आहे. आरोग्य विभागानं दिलेल्या आकडेवारीनुसार, १ ते २६ मे या कालावधीत १० वर्षांपर्यंतच्या ३४ हजारांहून अधिक जणांना करोनाची बाधा झाली आहे.

राज्यात काल २४ हजार ७५२ नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज २३ हजार ०६५ करोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ४५३ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com