Saturday, April 27, 2024
Homeदेश विदेशदेशात पुन्हा वाढला करोनाचा संसर्ग; सक्रिय रुग्णांची संख्या ४४ हजारांवर

देशात पुन्हा वाढला करोनाचा संसर्ग; सक्रिय रुग्णांची संख्या ४४ हजारांवर

दिल्ली | Delhi

करोनाच्या (coronavirus) तिसऱ्या लाटेतून सावरत व्यवहार पूर्वपदावर आले असतानाच देशात करोना संसर्ग पुन्हा चिंता वाढवत आहे. आज देशात ८ हजाराहून अधिक नोंद झाली आहे. (corona new cases)

- Advertisement -

गेल्या २४ तासात ८ हजार ५८२ नवे रुग्ण आढळून आले आहे. त्यानंतर देशातील सक्रिय रुग्णांची संख्या वाढून ४४ हजार ५१३ वर पोहोचली आहे. तसेच गेल्या २४ तासात ४ हजार २१६ लोक करोनामुक्त झाले आहेत. मात्र, १० रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

गेल्या ३ महिन्यात करोना रुग्णांमध्ये लक्षणीय घट झाली होती. मात्र, गेल्या बुधवारी एकाच दिवसाता ५ हजारहून अधिक करोना रुग्ण आढळून आले आहेत. देशात एकूण करोनाबाधितांचा आकडा ४ कोटी ४२ लाखांवर पोहचला आहे. तर करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ५ लाख २४ हजार ७४७ आहे.

दरम्यान करोना रुग्णांची संख्या वाढल्यानंतर बूस्टर डोससाठी नागरिकांनी रांगा लावल्या आहेत. त्यामुळं थंडावलेल्या लसीकरणाला पुन्हा वेग आला आहे. ज्यांचे लसीकरण झालेले नाही तसेच बूस्टर मात्रा न घेतलेल्या रुग्णांनी आता लसीकरणासाठी गर्दी केल्याचे दिसत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या