Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशCOVID19 : देशात गेल्या २४ तासात ३.६२ लाख नवे रुग्ण

COVID19 : देशात गेल्या २४ तासात ३.६२ लाख नवे रुग्ण

दिल्ली | Delhi

करोनाची दुसरी लाट आणि नव्या स्ट्रेनने भारतात चांगलाच कहर केला आहे. एकीकडे केंद्र-राज्यांकडून विविध उपाययोजना केल्या जात असून, करोनाच्या संसर्गाच्या प्रसाराला अद्यापही ब्रेक लागलेला नाही. तसेच, देशात मृत्यूचं प्रमाण वाढलं असून, ते कायम आहे. देशात गेल्या काही दिवसांपासून चार हजारांच्यावर मृत्यूंची नोंद होत आहे.

- Advertisement -

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ३ लाख ६२ हजार ७२७ नवे करोना रुग्ण आढळले असून ४ हजार १२० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

Good News : करोनाची दुसरी लाट ओसरतेय ; ‘ही’ आहेत दहा कारणे

देशातील एकूण करोना रुग्णसंख्या २ कोटी ३७ लाख ०३ हजार ६६५ इतकी झाली आहे. तर दुसरीकडे आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २ लाख ५८ हजार ३१७ वर पोहोचली आहे.

तसेच देशात गेल्या २४ तासात ३ लाख ५२ हजार १८१ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. या संख्येसह करोनावर मात करणाऱ्यांची संख्या १ कोटी ९७ लाख ३४ हजार ८२३ वर पोहचली आहे.

महाराष्ट्रातील स्थिती काय?

राज्यात काल दिवसभरात ४६ हजार ७८१ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर ५८ हजार ८०५ रुग्णांनी करोनावर मात केली. गेल्या २४ तासांत राज्यात ८१६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या