COVID19 : देशात नव्या रुग्णांपेक्षा करोनावर मात करणाऱ्यांची संख्या अधिक, पण...

COVID19 : देशात नव्या रुग्णांपेक्षा करोनावर मात करणाऱ्यांची संख्या अधिक, पण...

दिल्ली | Delhi

भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार पाहायला मिळत होता. मात्र काही दिवसांपासून या लाटेचा वेग कमी होत आहे. असं असलं तरी करोना रुग्णांचा वाढते मृत्यू चिंताजनक आहे. देशातील एकूण मृतांची संख्या तीन लाखांच्या पार गेली असून गेल्या २४ तासात चार हजाराहून अधिक रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत २ लाख २२ हजार ३१५ नवे करोना रुग्ण आढळले असून ४ हजार ४५४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. देशातील एकूण करोना रुग्णसंख्या २ कोटी ६७ लाख ५२ हजार ४४७ इतकी झाली आहे.

तर आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ३ लाख ०३ हजार ७२० वर पोहोचली आहे. तसेच देशात गेल्या २४ तासात ३ लाख ०२ हजार ५४४ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. या संख्येसह करोनावर मात करणाऱ्यांची संख्या २ कोटी ३७ लाख २८ हजार ०११ वर पोहचली आहे.

दरम्यान, करोनासोबतच आता म्युकरमायकोसिस म्हणजे ब्लॅक फंगस या आजाराने डोकं वर काढलं आहे. म्युकरमायकोसिस या आजाराने गेल्या काही दिवसात हजारो लोकांना बाधा झाली आहे. आतापर्यंत हरियाणा, गुजरात, उत्तर प्रदेश आणि पंजाबसह १४ राज्यांत हा आजार साथीचा रोग जाहीर झाला आहे.

महाराष्ट्रातील स्थिती काय?

सर्वाधिक रुग्णसंख्या आढळून आलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. राज्यात दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त होत असलेल्यांची संख्या मागील काही दिवसांपासून सातत्याने अधिक आहे. ही बाब जरी दिलासा देणारी असली तरी, अद्यापही करोना रूग्णांच्या मृत्यू संख्या कमी झालेली नाही. गेल्या २४ तासांत राज्यात २९ हजार १७७ रूग्ण करोनातून बरे झाले असून, २६ हजार ६७२ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. तर, ५९४ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com