देशातील करोना बाधितांनी 20 लाखाचा टप्पा ओलांडला !
मुख्य बातम्या

देशातील करोना बाधितांनी 20 लाखाचा टप्पा ओलांडला !

गेल्या २४ तासात ८८६ बाधितांचा मृत्यू

Nilesh Jadhav

दिल्ली | Delhi

गेल्या २४ तासात देशातील करोना बाधितांची संख्या ६२,५३७ ने वाढली आहे. तर ८८६ बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील एकूण करोना बधितांची संख्या २०,२७,०७४ झाली आहे. तर आतापर्यंत ४१,५८५ बाधितांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात ६,०७,३८४ बधितांवर उपचार सुरू असून १३,७८,१०५ रुग्ण करोनामुक्त झाले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com