करोना लस
करोना लस
मुख्य बातम्या

करोना लसीची ही आहे किंमत

पुण्याच्या सिरम इन्स्टिट्युटकडून माहिती जाहीर

jitendra zavar

jitendra zavar

पुणे

पुण्यातली सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने ऑक्सफर्डच्या मदतीने लस आणण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. जगातल्या सर्वच देशांमध्ये असलेल्या गरीबांना ही लस उपलब्ध करण्याचा भारताचा मानस आहे. त्यासाठी पुण्याच्या सिरम इन्स्टिट्युटने पाबले उचललली आहेत.

सीरम इन्स्टिट्युट सोबत Global Alliance for Vaccines and Immunization (GIVE) ही आंतरराष्ट्रीय लस संस्था आणि बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन एकत्र आले आहेत. गेट्स फाऊंडेशन करोना लसीसाठी १५० दक्षलक्ष डॉलर्सचा निधी देणार आहे. GAVI मार्फत हा निधी सीरम इन्स्टिट्युटला दिला जाणार आहे. सीरम इन्स्टिट्युट २०२१ पर्यंत जवळपास १०० दशलक्ष डोस पुरवण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. या लशीची किंमत जास्तीत जास्त ३ डॉलर म्हणजे फक्त २२५ रुपये असणार आहे. सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया ही रोगप्रतिकारक औषध निर्मिती करणारी कंपनी आहे. सिरमच्या लसी मानवी चाचण्यांच्या टप्प्यात आहेत.

करोना संकटातून मार्ग काढण्याचा उपाय म्हणजे त्यावरची लस. ही लस लवकरात लवकर तयार व्हावी यासाठी अनेक देशांमध्ये प्रयत्न सुरु आहेत. पुण्यातली सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने ऑक्सफर्डच्या मदतीने लस आणण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. ही लस आल्यानंतर ती सुरक्षित आणि सामान्य लोकांना परवडणारी असावी यासाठी भारत प्रयत्नशील आहे. फक्त भारतातच नाही तर जगातल्या देशांमध्ये असलेल्या गरीबांना ही लस उपलब्ध करण्याचा भारताचा मानस आहे.

सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया ही रोगप्रतिकारक औषध निर्मिती करणारी कंपनी आहे. जगातली एक उत्तम संस्था असा या संस्थेचा लौकिक आहे. जगभरात सध्या करोनावरच्या अनेक लसींवर काम सुरु आहे. यापैकी काही लसी ह्युमन ट्रायलच्या टप्प्यात आहेत. सिरमनेही ऑक्सफर्ड आणि अमेरिकेच्या Novavax या कंपनीसोबत लसींसंदर्भातला करार केला आहे. यांच्या चाचण्या यशस्वी झाल्या आणि त्याला संमती मिळाली तर सिरम इन्स्टिट्युला लस उत्पादनासाठी निधी मिळणार आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com