करोना लस, ऑक्सिजन, उपकरणे होणार स्वस्त

करोना लस, ऑक्सिजन, उपकरणे होणार स्वस्त

नवी दिल्ली । वृत्तसंस्था

करोना लसीकरणासाठी वापरल्या जाणार्‍या लसींवर, मेडिकल ऑक्सिजन आणि संबंधित उपकरणांवर आयात शुल्क माफ करण्यात आल्याची घोषणा केंद्राकडून करण्यात आली आहे.ही सूट तीन महिन्यांसाठी देण्यात येणार आहे.

देशात ऑक्सिजन तुटवड्याचें संकट जाणवत असताना 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना लसीकरण मोहिमेत सहभागी होता येणार आहे. याआधी केंद्राने आयात शुल्क माफ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

सध्या सरकारकडून परदेशातून येणार्‍या लसींवर 10 टक्के सीमा शुल्क किंवा आयात शुल्क आणि 16.5 टक्के आय-जीएसटी तसंच सामाजिक कल्याण सेस लावला जातो. या करांच्या ओझ्यामुळे आयात करण्यात आलेल्या लसींची किंमत सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाच्या मकोव्हिशिल्डफ आणि भारत बायोटेकच्या मकोव्हॅक्सिनफ लसींहून कित्येक पटीनं वाढते. परंतु, सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे लसींच्या किंमतीवर नियंत्रण राहण्यास मदत होईल.

ऑक्सिजन तुटवड्यामुळे देश मोठ्या कठिण प्रसंगातून वाटचाल करत आहे. केंद्र आणि राज्य सरकार ऑक्सिजनसाठी धडपड करत असताना अनेक रुग्णालयांत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्णांनी प्राण सोडल्याच्या घटना घडत आहेत. खास मऑक्सिजन एक्सप्रेसफ रेल्वे ठिकठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढण्यासाठी वापरल्या जात आहेत. अशा वेळी ऑक्सिजनसंबंधित कोणत्याही उपकरणावर सीमा शुल्क हटवत ती थेट गरजवंतांपर्यंत पोहचवण्याचा मार्ग सरकारनें मोकळा केला आहे.

तसेच लसीकरण मोहिमेत देशातील जास्तीत जास्त नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी राज्य, खासगी रुग्णालय आणि औद्योगिक संस्थांनाही थेट लस विक्रेत्यांकडून लस खरेदी करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com