व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवा लसीचे प्रमाणपत्र; 'असे' करा डाउनलोड

व्हॉट्सअ‍ॅप
व्हॉट्सअ‍ॅप

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची (Corona third wave) शक्यता तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. करोनापासून स्वतःला सुरक्षित ठेवायचे असेल तर करोना प्रतिबंधक लस (Corona vaccine) घेणे अत्यंत गरजेचे आहे. लसीचा डोस घेतल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला प्रमाणपत्र (Certificate) दिले जाते. पुढील काळात लसीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक ठरणार आहे.

त्यामुळे लसीकरण (Vaccination) झाल्याचे प्रमाणपत्र तुमच्याकडे नसेल तर ते आताच डाउनलोड करून ठेवा. आतापर्यंत हे केलेले नसेल तर व्हॉट्सअ‍ॅपद्वारे तुम्ही प्रमाणपत्र डाउनलोड (Download) करू शकता. जाणून घ्या पद्धत...

व्हॉट्सअ‍ॅपने लसीचे प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी एक नवीन फीचर आणले आहे. यामुळे वापरकर्त्यांना करोना वॅक्सीन सर्टिफिकेट (Corona vaccine certificate) डाउनलोड करू शकतील. व्हॉट्सअ‍ॅपने केंद्र सरकारसोबत (Central Government) भागीदारी केली आहे.

लोकांना आतापर्यंत वॅक्सीन सर्टिफिकेट CoWIN वेबसाईट अथवा आरोग्य सेतू (Aarogya Setu) अ‍ॅपवरून डाउनलोड करावे लागत होते. मात्र आता सरकारने MyGov Corona Helpdesk WhatsApp Chatbot द्वारे प्रमाणपत्र डाउनलोड केले जाऊ शकते.

यासाठी वापरकर्त्यांना MyGov कोरोना हेल्पडेस्क WhatsApp चॅटबॉटचा वापर करावा लागणार आहे. आपल्या फोनमध्ये +९१ ९०१३१५१५१५ हा क्रमांक सेव्ह करावा. नंतर या नंबरवर व्हॉट्सअ‍ॅप मॅसेज पाठवावा. वॅक्सीन सर्टिफिकेट डाउनलोड करण्यासाठी चॅटमध्ये "Download certificate" असा मॅसेज करा.

चॅटबॉस तुम्हाला रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर ६ अंकांचा ओटीपी (OTP) पाठवेल. तो ओटीपी त्या नंबरवर पाठवावा लागेल. ओटीपी वेरिफाय होईल त्यांनतर तुम्हाला नाव आणि मोबाईलनंबरसह एक मॅसेज येईल. यावेळी तुम्हाला विचारले जाईल की, वॅक्सीन सर्टिफिकेट डाउनलोड करण्यासाठी १ टाईप करा. त्यानंतर १ लिहून पाठवल्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार आहे, जे तुम्ही डाउनलोड करता येईल.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com