Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedनाशिकसह राज्यात मुलांच्या लसीकरणास सुरुवात

नाशिकसह राज्यात मुलांच्या लसीकरणास सुरुवात

मुंबई :

15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरणास (corona vaccination) राज्यात सुरुवात झाली आहे. राज्यातील ६५० केंद्रांवर लसीकरण करण्यात येत आहे. नाशिकमधील सहा केंद्रांवरही लसीकरण सुरु झाले आहे. या लसीकरणासाठी ऑफलाइनही रजिस्ट्रेशन (offline registration) करता येणार आहे. ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासह ऑफलाईन सुविधा दिली जात आहे.

- Advertisement -

जालन्यामधील आरोग्य केंद्रामध्ये राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थित लसीकरणाला सुरूवात करण्यात आली. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मुलं खूप उत्साहाने लस घेत आहेत. त्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. केंद्र सरकारच्या सुचनेनुसार लसीकरणाचे काम सुरू आहे. स्वतंत्र लसीकरणाची व्यवस्था केली असल्याची माहिती यावेळी राजेश टोपे यांनी दिली.

कॅटरिनाने शेअर केला मेहंदीचा फोटो, चाहते शोधताय विकीचे नाव

अशी करा नोंदणी

  • – सर्व प्रथम Covin App वर जाऊन लॉग इन करा

  • – मुलाचं नाव, जेंडर आणि जन्मतारीख निवडा

  • – तुमच्या जवळच्या लसीकरण केंद्राचा पिन कोड टाका. लसीकरण केंद्रांची यादी येईल.

  • – आता लसीकरणाची तारीख, वेळ आणि लस निवडा

  • – लसीकरण केंद्रावर जाऊन संदर्भ आयडी, सीक्रेट कोड सांगा आणि लस घ्या

Photo कोण आहे मिस युनिव्हर्स झालेली हरनाज संधू

दहावीचे ओळखपत्रही पुरावा

महत्वाचं म्हणजे ज्या मुलांकडे आधार कार्ड किंवा इतर ओळखपत्र नसेल तर त्यांचं दहावीचं ओळखपत्रही पुरावा म्हणून ग्राह्य धरलं जाणार आहे.

नाशिकमधील ही आहेत केंद्र

सोमवारपासून वयोगट 15 पुढील कॉवक्सिनसाठी नाशिक शहरातील 6 ठिकाणी लसीकरण केंद्र असणार आहे . प्रत्येकी ऑनलाईन स्लॉट 100 ठेवण्यात आले आहे.

1)मेरी कोविड सेन्टर,पंचवटी

2)समाज कल्याण,नाशिक पुणे रोड

3)सिडको श प्रा आ केंद्र

4)डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय

5)ESIS हॉस्पिटल सातपूर

6)न्यू बिटको ,नाशिकरोड

- Advertisment -

ताज्या बातम्या