Friday, April 26, 2024
Homeनाशिकनाशिक विभागातील जिल्ह्यांना अशा मिळतील करोना लसी; पाहा एक्सक्लुसिव्ह व्हिडीओ

नाशिक विभागातील जिल्ह्यांना अशा मिळतील करोना लसी; पाहा एक्सक्लुसिव्ह व्हिडीओ

नाशिक | प्रतिनिधी

नाशिकमध्ये करोना लस दाखल झाल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. नाशिक विभाग म्हणजेच उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांसाठी आज नाशकात लस दाखल झाली आहे.

- Advertisement -

व्हिडीओ : सतिश देविगीरे, नाशिक

विभागासाठी एकूण १ लाख ३१ हजार ८९० लस पाठविण्यात आली आहे. यात नगरमध्ये काल ३९ हजर २९० देण्यात आली आहे.

तर नाशिकसह जळगाव, धुळे आणि नंदुरबार साठी आज लसी पोहोचविल्या जात आहेत. यामध्ये नाशिक जिल्ह्यासाठी ४३ हजार ४४० लस प्राप्त झाली असून शहरातील जिल्हा परिषद ग्राउंड फ्लोरवर ही ठेवण्यात आली आहे. त्यानंतर ही लस मालेगाव येथे पाठविण्यात येईल. यानंतर उपजिल्हा रुग्णालय व प्राथमीक आरोग्य केंद्रांना ही लस पोहोचविली जाईल.

तसेच धुळे जिल्ह्याला १२ हजार ४३०, जळगाव जिल्ह्याला २४ हजार ३२० तर नंदुरबार जिल्ह्याला १२ हजार ४१० लसी पाठविण्यात आल्या असून लवकरच जिल्हा प्रशासनाला या लशी प्राप्त होणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या