Friday, April 26, 2024
Homeदेश विदेशआजपासून सामान्यांचे लसीकरण, अशी करा नोंदणी

आजपासून सामान्यांचे लसीकरण, अशी करा नोंदणी

आजपासून ६० वर्षांवरील सर्व व्यक्तींना लस देण्यात येणार आहे. तसेच ४५ ते ५९ वयोगटातील इतर आजार असलेल्यांनाही लस दिली जाईल. सरकारी लसीकरण केंद्रावर मोफत लस दिली जाईल आणि त्याचा पूर्ण खर्च केंद्र सरकार करणार आहे. तर खासगी हॉस्पिटलमध्ये देणाऱ्यात येणाऱ्या कोरोना लशीच्या प्रत्येक डोसची किंमत २५० रुपये असेल.

आयुष्यमान भारतशी संलग्न असलेले देशातील १० हजार हॉस्पिटल आणि केंद्रीय आरोग्य योजनेतील ६८७ रुग्णालयात कोरोनाची लस दिली जाईल. भारतात लसींना परवानगी मिळाल्यानंतर गेल्या महिन्यात म्हणजेच १६जानेवारी रोजी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली होती. पण सुरुवातीच्या टप्प्यात फक्त कोव्हिड-योद्ध्यांचंच लसीकरण केले.

- Advertisement -

लसीकरणासाठी नोंदणी कशी करावी

को-विन ऍप मोबाईलवर डाउनलोड करा किंवा cowin.gov.in यावेबसाइटवरुन करता येईल.

मोबाइल नंबर व आधार नंबर टाका

ओटीपी टाकल्यावर नोंदणी पुर्ण होईल.

परिवारातील सदस्यांची नोंदणी यात करता येईल.

-केंद्र सरकारकडे मतदान यादीमधील ज्येष्ठ नागरिकांचा डेटा उपलब्ध आहे. पण, सरकारने सेल्फ रेजिस्ट्रेशनचा पर्याय निवडला आहे.

– सेल्फ रेजिस्ट्रेशनमध्ये को-विन, आरोग्य सेतु, रुग्णालय आणि कॉमन सर्व्हिस सेंटरवर रेजिस्ट्रेशन विंडो खुली असेल. या रेजिस्ट्रेशनसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

-६० वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या लोकांना नोंदणीसाठी एक फोटो आयडीची आवश्यकता असेल. अन्य आजाराने पीडित असलेल्या लोकांना वैद्यकीय प्रमाणपत्र दाखवावे लागणार आहे.

-लवकरच को-विनचे नवे व्हर्जन लॉन्च केले जाईल, यावर सामान्य लोक लसीकरणासाठी नाव रजिस्टर करु शकतील. लस घेतलेले लोक आयडी देऊन आपले सर्टिफिकेट डाऊनलोड करु शकतात.

-सरकार अन्य आजारांसाठी एक यादी आणि फॉर्म जारी करु शकते. याला लाभार्थीकडून भरुन घेतले जाईल. लसीकरणादरम्यान हा फॉर्म दाखवणे आवश्यक असेल.

-लसीकरणासाठी बुकिंग आणि ओपन स्लॉट असे दोन्ही पर्याय उपलब्ध असतील.

– लाभार्थी आपली लसीकरण साईट आणि वेळ निवडू शकतात. पण, कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनमध्ये तुम्हाला पर्याय दिला जाणार नाही. तसेच 50 वर्षांपुढील व्यक्ती ज्यांना कसल्याही प्रकारचा आजार नाही, त्यांना लशीसा

- Advertisment -

ताज्या बातम्या