Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशचिंताजनक! भारतात २४ तासांत चार लाखांहून अधिक रुग्णांची नोंद

चिंताजनक! भारतात २४ तासांत चार लाखांहून अधिक रुग्णांची नोंद

दिल्ली | Delhi

भारतात गेल्या काही दिवसांपासून करोनाने कहर केला असून दैनंदिन रुग्णसंख्येने उच्चाकं गाठले आहेत. करोनाच्या दुसऱ्या लाटेनं भारतात हाहाकार माजवल्याचं चित्र आहे.

- Advertisement -

भारतात गेल्या आठवड्यापासून दैनंदिन रुग्णसंख्येत होणारी वाढ अद्यापही कायम असून मागील २४ तासांत देशात ४ लाखांहून नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्याही चिंता वाढवणारी ठरत आहे. २४ तासांत ४ लाखांहून जास्त करोना रुग्ण सापडलेला भारत हा जगातला पहिलाच देश ठरला आहे. या आकडेवारीमुळे एक नकोसा विक्रम भारताच्या नावावर आला आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत आतापर्यंतच्या सर्वाधिक मृत्यूंची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत ३ हजार ५२३ रुग्णांनी आपला जीव गमावला असून हा आतापर्यंतचा उच्चांक आहे.

देशात गेल्या २४ तासांत ४ लाख ०१ हजार ९९३ नवे करोना रुग्ण आढळले असून यासोबत देशातील कोरोना रुग्णसंख्या १ कोटी ९१ लाख ६४ हजार ९६९ इतकी झाली आहे. तर दुसरीकडे आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २ लाख ११ हजार ८५३ वर पोहोचली आहे.

दरम्यान देशात गेल्या २४ तासात २ लाख ९९ हजार ९८८ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. या संख्येसह करोनावर मात करणाऱ्यांची संख्या १ कोटी ५६ लाख ८४ हजार ४०६ वर पोहचली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या