Thursday, April 25, 2024
Homeदेश विदेशकोरोना संकटावर सुप्रीम कोर्टाने केंद्राला फटकारले : या ४ मुद्द्यांवर मागितला खुलासा

कोरोना संकटावर सुप्रीम कोर्टाने केंद्राला फटकारले : या ४ मुद्द्यांवर मागितला खुलासा

नवी दिल्ली

कोरोनाची वाढती प्रकरणे आणि बिघडती परिस्थिती पाहता आता सुप्रीम कोर्टाने कठोर भूमिका घेतली आहे. देशभरातील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, बेड आणि आवश्यक औषधांची कमतरता असल्याची न्यायालयाने दखल घेत ४ मुद्द्यांवर केंद्र सरकारकडे खुलासा मागवला आहे. आता याप्रकरणीची सुनावणी २३ एप्रिल रोजी होणार आहे.

- Advertisement -

नाशिकमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा : नगर, औरंगबादहून येणार पुरवठा

कोरोना परिस्‍थितीवर सर्वोच्‍च न्‍यायालयाने आज तीव्र चिंता व्‍यक्‍त केली. कोरोनामुळे देशातील स्‍थिती राष्‍ट्रीय आणीबाणी सारखी झाली आहे, असे निरीक्षण सरन्‍यायाधीश एस. एस. बोबडे यांनी नोंदवले. सरन्यायाधीश म्हणाले की ऑक्सिजनचा पुरवठा, अत्यावश्यक औषधांचा पुरवठा, लसीकरणाची पद्धत, लॉकडाऊनचा राज्यांचा अधिकार अशा चार मुद्द्यांचा सर्वोच्च न्यायालय विचार करत आहे. संबंधित चार मुद्‍यांवर केंद्र सरकारने खुलासा करावा, अशी नोटीसही त्‍यांनी ‍बजावली.

नाशिक ऑक्सिजन लिकेज : २२ जणांचा मृत्यू, संख्येत वाढ होण्याची भीती

कोरोना आणि ऑक्सिजनसारख्या मुद्द्यांवर सहा वेगवेगळे उच्च न्यायालये म्हणजेच दिल्ली, बॉम्बे, सिक्कीम, मध्य प्रदेश, कलकत्ता आणि अलाहाबाद उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असल्याचे आम्ही पाहत आहोत. आहे. यामुळे गोंधळ होऊ शकतो. खंडपीठाने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना या विषयावर राष्ट्रीय नियोजन करण्यास सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या