भारतात लवकरच तिसरी लस

भारतात लवकरच तिसरी लस

नवी दिल्ली। वृत्तसंस्था

नुकतीच भारतात वापरासाठी मान्यता मिळालेल्या रशियाच्या करोना प्रतिबंधात्मक स्पुटनिक व्ही या लसीसाठी आता दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागणार नाही.

भारतात या लसीचे उत्पादन डॉ. रेड्डीजकडून करण्यात येत आहे. ही लस मे-जूनमध्ये भारतात उपलब्ध होईल, अशी माहिती डॉ. रेड्डीजकडून देण्यात आली. तसेंच यावेळी त्यांनी या लसीच्या किंमतीचा खुलासाही केला.

मे-जून महिन्यापर्यंत आयातीच्या माध्यमातून भारतासाठी स्पुटनिक व्ही ही लस उपलब्ध असेल, अशी माहिती डॉ. रेड्डीज लॅबचे व्यवस्थापकीय संचालक जी.व्ही.प्रसाद यांनी दिली. कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन नंतर स्पुटनिक व्ही ही तिसरी लस आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com