नाशिक जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या ६४ हजार पार

jalgaon-digital
2 Min Read

जिल्ह्यात आतापर्यंत ५३ हजार २०१ रुग्ण करोनामुक्त; सद्यस्थितीत ९ हजार ६२८ रुग्णांवर उपचार सुरू

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक जिल्ह्यातील ५३ हजार २०१ कोरोना बाधीतांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ९ हजार ६२८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

तर आत्तापर्यंत १ हजार १७३ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अनुक्रमे नाशिक ३७३, चांदवड ११२, सिन्नर ५३६, दिंडोरी १३३, निफाड ७१३, देवळा ३६, नांदगांव २९१, येवला ७६, त्र्यंबकेश्वर ४६, सुरगाणा २५, पेठ २१, कळवण ८०, बागलाण २१६, इगतपुरी ३९९, मालेगांव ग्रामीण २२३ असे एकूण ३ हजार २८० पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

आजपर्यंत ६४ हजार ००२ करोनाबाधित रुग्णांपैकी ५३ हजार २०१ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ५ हजार ६४८, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ६०७ तर जिल्ह्याबाहेरील ९३ असे एकूण ९ हजार ६२८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

जिल्हयामध्ये रुग्ण बरे होण्याची टक्केवारीचा जर विचार केला तर नाशिक ग्रामीण मधे ७७.७९, टक्के, नाशिक शहरात ८५.६४ टक्के, मालेगाव मध्ये ७७.९८ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ६९.१७ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८३.१२ इतके असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.

आतापर्यंत नाशिक ग्रामीणमध्ये ३५९ रुग्ण दगावले आहेत तर नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ६४२ मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून १४६ व जिल्हा बाहेरील २६ अशा एकूण १ हजार १७३ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *