सिन्नर तालुक्यात करोना बाधितांचा आकडा ३०० पार
मुख्य बातम्या

सिन्नर तालुक्यात करोना बाधितांचा आकडा ३०० पार

शहरात नवे 10 बाधित; ग्रामीण भागात 21 रुग्ण

Dinesh Sonawane

Dinesh Sonawane

सिन्नर । दि. 16 प्रतिनिधी

तालुक्यात आज(दि.16) सलग दुसर्‍या दिवशी ‘करोना’ चे 31 रुग्ण आढळले असून तालुक्यातील करोना बाधीतांची संख्या 308 वर पोहचली आहे. त्यातील 206 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून 8 रुग्णांचा यापूर्वी मृत्यू झाला आहे. 94 रुग्णांवर उपजिल्हा रुग्णालय व नाशिकच्या जिल्हा शासकीय, खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत.

सिन्नर शहरातील विजय नगरमध्ये 3, शिवाजी नगरमध्ये 2, खडकपूरा, गणेश नगर, श्रीकृष्ण नगर, संभाजी नगर, गंगा वेस येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. विजय नगरमधील 17 व 41 वर्षीय महिला, बावीस वर्षीय तरुण, शिवाजी नगरमधील 83 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, 50 वर्षीय महिला, गणेश नगरमधील 48 वर्षीय पुरुष, संभाजीनगरमधील 23 वर्षीय युवक, गंगा वेशीतील 39 वर्षीय तरुण, खडकपूर्‍यावरील 23 वर्षीय युवक, श्रीकृष्णनगरमधील 40 वर्षीय पुरुष यांचा त्यात समावेश आहे.

तालुक्यातील मनेगाव व चिंचोली येथे प्रत्येकी पाच, नांदूरशिंगोटेत 4, पांढूर्लीत 2, माळेगाव, विंचूर दळवी, धुळवड , बारागाव पिंप्री, दोडी खुर्द येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे.

मनेगाव येथे 30 व 39 वर्षीय पुरुष, 19 वर्षीय युवक, 21 वर्षीय तरुणी, 47 वर्षीय महिला यांना संसर्ग झाला आहे.

चिंचोली येथे 82, 39, 29 व 22 वर्षीय पुरुष, 9 वर्षीय मुलीला करोनाने गाठले आहे. नांदुर-शिंगोटे येथे 26 व 47 वर्षीय महिला, 32 वर्षीय व 45 वर्षीय पुरुष करोनाबाधीत निघाले आहेत. पांढूर्लीत 27 वर्षीय युवक, 26 वर्षीय महिला, बारागाव पिंपरी येथे 45 वर्षीय महिला,माळेगाव येथे 45 वर्षीय महिला, विंचूर दळवीत 31 वर्षीय युवक, धुळवाड येथे 45 वर्षीय महिला, दोडी खूर्द येथे 46 वर्षीय महिला पॉझिटिव निघाले आहेत.

उपजिल्हा रुग्णालयात सुरु करण्यात आलेल्या डेडीकेटेड करोना हेल्थ केअर संटरमध्ये 100 रुग्ण दाखल करता येऊ शकतात. सध्याच्या रुग्णांची संख्या 94 असली तरी या रुग्णांच्या जवळून संपर्क आलेल्या संशयितांनाही रुग्णालयात दाखल करुन त्यांची थुंकी तपासण्यासाठी पाठविण्यात येते. त्याचा अहवाल येईपर्यंत हे रुग्ण रुग्णालयातच असतात. अशा 45 संशयितांचे अहवाल अजून आलेले नाहीत. यांना पकडून रुग्णालयात दाखल असलेल्यांची संख्या 135 च्या पुढे जाते. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालय हाऊसपुल्ल झाले असून रतन इंडियाच्या विश्रामगृहात सुरु करण्यात आलेल्या करोना केअर सेंटरमध्ये जवळपास 35 संशयीत दाखल आहेत. आज आढळलेल्या रुणांच्या जवळचे संशयीत आणल्यास हे सेंटरही हाऊसपुल्ल होण्याची शक्यता आहे.

Deshdoot
www.deshdoot.com