नाशिकमध्ये करोना ग्रस्तांची संख्या पोहोचली दहा हजारांवर

२४ तासांत ३३४ पॉझिटिव्ह रूग्ण आढळले
नाशिकमध्ये करोना ग्रस्तांची संख्या पोहोचली दहा हजारांवर

नाशिक । Nashik प्रतिनिधी

नाशिक शहर तसेच जिल्ह्यात करोनाचा उद्रेक सुरूच असून आज चोवीस तासात जिल्ह्यात 334 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

यामुळे जिल्ह्यातील करोनाग्रस्तांच्या आकड्याने 10 हजाराचा टप्पा पार केला असून ही संख्या 10 हजार 25 इतकी झाली आहे.

तर एकाच दिवसात जिल्ह्यातून 936 नवे संशयित दाखल झाले आहेत. आज शहरासह जिल्ह्यातील 14 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर एकाच दिवसात 380 रूग्णांनी करोनावर मात केली आहे.

आज रात्रीपर्यंत जिल्हा प्रशासनास प्राप्त अहावालानुसार आज दिवसभरात एकुण 334 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत.

यामध्ये एकट्या नाशिक शहरातील 180 रूग्ण आहेत. यात शहरातील नवीन नाशिक, जेलरोड, पंचवटी, सातपुर गाव, कामगारनगर, इंदिरानगर, रामवाडी, हिरावाडी, पेठरोड, दिंडोरीनाका , अशोकानगर, नाशिकरोड, ंपेठरोड , जुने नाशिक, जेलरोड, इंदिरानगर, वडाळारोड, येथील रूग्णांचा सामावेश आहे. यामुळे नाशिक शहराचा आकडा 6 हजार 70 वर पोहचला आहे.

आज ग्रामिण भागातील 154 पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. यामुळे ग्रामिण भागातील रूग्णांचा आकडा 2 हजार 597 झाला आहे.

यामध्ये सर्वाधिक येवला, सिन्नर, सुरगाणा, नांदुर खुर्द, राणमळा, विंचुर, वणी, पिंपळगाव बसवंत, रावळगाव, उमराळे, इगतपुरी, भगुर, त्र्यंबकेश्वर, घोटी, इगतपुरी, नांदगाव, देवळाली कॅम्प येथील रूग्ण आहेत.

मालेगावचा आकडा 1 हजार 204 वर स्थिर आहेे. जिल्हा बाह्य रूग्णांचा आकडा 179 वर पोहचला आहे.

तर करोनामुळे आज दिवसभरात 14 जणांचा मत्यू झाला. यामध्ये सर्वाधिक 6 रूग्ण नाशिक शहरातील तर उर्वरीत सहा ग्रामिण भागातील आहेत.

यामुळे जिल्ह्यातील मृत्यूचा आकडा 412 झाला आहे.आज दिवसभरात जिल्ह्यातील 380 रूग्णांनी करोनावर मात केली आहे. यामुळे करोना मुक्त होणारांचा आकडा 6 हजार 970 वर पोहचला आहे.

करोना रूग्ण वाढत असतानाच दुसरीकडे नव्याने दाखल होणार्‍या संशयितांचा आकडा वाढत चालला असून आज एकाच दिवसात नव्याने 936 संशित रूग्ण दाखल झाले आहेत. यामध्ये शहरातील सर्वाधिक 610 तर उर्वरीत जिल्ह्यातील 231 आहेत.

जिल्हा रूग्णालय 5, मालेगाव 17, डॉ. वसंतराव पवार रूग्णालय 2 व होम कोरोंटाईन 71 रूग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आतापर्यंत जिल्ह्यातून 36 हजार 362 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यातील 25 हजार 286 निगेटिव्ह आले आहेत. 10 हजार 25 पॉझिटिव्ह आले आहेत. यातील 2 हजार 643 रूग्ण उपचार घेत आहेत.

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार

एकूण कोरोना बाधित: 10,025

नाशिक : 6070

मालेगाव : 1204

उर्वरित जिल्हा : 2597

जिल्हा बाह्य ः 179

एकूण मृत्यू: 412

करोनामुक्त : 6970

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com