Monday, April 29, 2024
Homeदेश विदेशकराेना : भारत चाैथ्यावरुन तिसऱ्या क्रमांकावर

कराेना : भारत चाैथ्यावरुन तिसऱ्या क्रमांकावर

जिल्ह्यात आज २० करोना बाधित आढळले

नवी दिल्ली

- Advertisement -

देशात कराेनाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. आता देशाचा कराेना बाधितांचा आकडा 7 लाख 724 झाला आहे. जागतिक पातळीवर कराेना रुग्ण असलेल्या देशात भारत चाैथ्यावरुन तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून त्याची संख्या २ लाख ६ हजारापेक्षा जास्त रुग्ण आहेत. देशात आता पाचच दिवसात एक लाख रुग्ण वाढत आहे.

www.covid19india.org/ या बेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत ७ लाख ७२४ रुग्ण आहेत. त्यातील १९ हजार ७१४ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील रुग्ण बरे हाेण्याचे प्रमाण आता ६० टक्क्यांपेक्षा जास्त झाले आहे. देशात सर्वाधिक रुग्णसंख्यात महाराष्ट्रात आहे. तसेच महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली आणि गुजरात ही चार मिळूनच चार लाखापेक्षा जास्त रुग्ण आहेत.

या महिन्यात १२ लाख रुग्ण हाेणार

देशात कराेनाचा पहिला रुग्ण ३० जानेवारी राेजी सापडला हाेता. त्यानंतर ७ लाख रुग्ण हाेण्यासाठी १५८ दिवस लागले. आता पाचच दिवसात १ लाख रुग्ण हाेत असल्याने या महिन्यात १२ लाखापेक्षा जास्त रुग्ण हाेण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या