नाशिक । प्रतिनिधी

नाशिक शहरासह जिल्ह्याच्या ग्रामिण भागात कारोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत असून आज एकाच दिवसात पुन्हा एकदा विक्रमी 4 हजार 334 पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. यात नाशिक ग्रामिण भागाील सुमारे 1 हजार 768 रूग्णांचा सामावेश आहे. तर मृत्यूचा दरही वाढला असून आज 22 बळी गेले आहेत यातील 10 ग्रामिण भागातील आहेत.

नाशिक शहराबरोबरच ग्रामिण भागात कोरोनाचे रूग्ण झपाट्याने वाढत आहेत. शनिवारी हा आकडा अचानक 4 हजार 334 वर पोहचला आहे. परिणामी आतापर्यंत जिल्ह्यातील करोना पॉझिटिव्हचा आकडा 1 लाख 93 हजार 635 च्यावर पोहचला आहे. तर सध्या जिल्हाभरात 33 हजार 751 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील चोवीस तासात 3 हजार 98 रूग्णांनी करोनावर मात केली. यामुळे आतापर्यंत करोनामुक्त होणारांचा आकडा 1 लाख 61 हजार 743 वर पोहचला आहे.

जिल्हा प्रशासनास प्राप्त अहवालानुसार मागील 24 तासात 4 हजार 334 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये नाशिक शहरातील सर्वाधिक 2 हजार 401 रुग्ण आहेत. यामुळे नाशिक शहराचा आकडा 1 लाख 21 हजार 244 वर पोहचला आहे. ग्रामिण भागातही रूग्ण संख्या झपाट्याने वाढीस लागली असून आज ग्रामिण भागातील 1 हजार 768 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामुळे ग्रामिण भागातील रुग्णांचा आकडा 60 हजार 817 झाला आहे. मालेगावात 91 रूग्ण आढळल्याने येथील आकडा 9 हजार 22 झाला आहेे. जिल्हा बाह्यचा आकडा 2 हजार 552 झाला आहे.

याबरोबरच करोना मृत्यूमध्ये सातत्य असून यामध्ये आज जिल्ह्यात 22 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहरातील 8, ग्रामिण भागातील 10, मालेगाव 3 तर जिल्हाबाह्य 1 रूग्णांचा सामावेश आहे. यामुळे जिल्ह्यात मृत्युचा आकडा 2 हजार 447 इतका झाला आहे. याबरोबरच दुसरीकडे नव्याने दाखल होणार्या संशयितांचा आकडाही वाढत चालला असून मागील चोवीस तासात 4 हजार 306 नवे संशयित दाखल झाले आहेत. यामध्ये सर्वाधिक 4 हजार 544 रूग्ण नाशिक शहरातील आहेत. ग्रामिण भागातील 207 तर मालेगाव येथील 45 रूग्ण आहेत.

जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार

* एकूण करोना बाधित : 1,93,635

* नाशिक : 1,21,244

* मालेगाव : 9,022

* उर्वरित जिल्हा : 60,817

* जिल्हा बाह्य ः 2,552

* एकूण मृत्यू: 2,447

* करोनामुक्त : 1,61,743